Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस

Airtel 5G Plus सर्विस मुंबईसह या शहरात लाँच, नवीन सिम कार्डविना मिळेल फ्री 5G सर्विस

Airtel 5G Launched: Jio True 5G च्या Beta Trail सर्विस लाँचिंगच्या घोषणेनंतर भारती एअरटेलने देशात Airtel 5G Plus सेवा सुरू केली आहे. टेलिकॉम सेक्टरमध्ये सर्वात आधी 5G सर्विस सुरू करणाऱ्या एअरटेलची 5G (Airtel 5G Plus) सध्या ८ शहरात लाइव्ह करण्यात आली आहे. कंपनी यूजर्सला मेसेज सुद्धा करीत आहे. याशिवाय, 5G प्लस सर्विस (Airtel 5G Plus Service) वरून कंपनीचे म्हणणे आहे की, यूजर्सला आता आधीच्या तुलनेत २० ते ३० पट जास्त वेगाने नेटवर्क सुविधा मिळेल. ज्यात शानदार साउंड एक्सपीरियन्स सोबत जबरदस्त कॉल कनेक्टिविटीचा समावेश आहे. याशिवाय, कंपनीने Airtel 5G SIM आणि Airtel 5G Plan वरून यूजर्सच्या प्रश्नाची उत्तरे सुद्धा द्यायला सुरुवात केली आहे.

Airtel 5G Plus या शहरात झाली सुरू

Airtel 5G Plus सर्विसा ला सर्वात आधी देशातील ८ प्रमुख शहरात म्हणजेच दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, सिलिगुडी, नागपूर, आणि वाराणासी या आठ शहरात सर्वात आधी ही सर्विस सुरू करण्यात आली आहे. तर एअरटेल कंपनी आपल्या एअरटेल ग्राहकांना मेसेज पाठवून या संबंधी माहिती देत आहेत.

Airtel 5G SIM कसे मिळेल

एअरटेल कंपनी आधीच हे स्पष्ट केले आहे की, कंपनीच्या ५जी प्लस सेवेचा लाभ मिळवण्यासाठी एअरटेल ग्राहकांना आपले सिम कार्ड (Airtel 5G SIM) बदलण्याची गरज नाही. कारण, Airtel 4G SIM मध्ये ५जी नेटवर्कचा वापर केला जावू शकतो. म्हणजेच सध्या ५जी सिम कार्डची गरज नाही. तुम्ही जर देशातील ८ प्रमुख शहरातील यूजर्स असाल तर तुम्हाला याचा लाभ मिळू शकणार आहे.

Airtel 5G Recharge Plan

कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्या ४ जी प्लानच्या किंमतीत ग्राहकांना ५जीचा वापर करता येणार आहे. म्हणजेच तुम्ही ४जीच्या किंमतीत ५जीची मजा मिळू शकणार आहे. याचाच अर्थ एअरटेलचा सर्वात स्वस्त ५जी रिचार्ज प्लान २४९ रुपयाचा असेल जो ४जी प्लान आहे. यात २ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा आणि २४ दिवसाची वैधता मिळते.

Airtel 5G Plus Speed

कंपनीने दावा केला की, एअरटेल ५जी प्लस मध्ये यूजर्संना आता ३० पट वेगाच्या स्पीडने इंटरनेटचा वापर करता येणार आहे. सोबत कंपनीने एअरटेल ५जी प्लस सर्विसला ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून लाइव्ह सुद्धा केले आहे. म्हणजेच देशातील ८ प्रमुख शहरात एअरटेल ५जी सर्विसचा वापर करता येवू शकणार आहे.

​सुपरफास्ट स्पीडने होणार झटपट काम

भारती एअरटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ गोपाल विट्टल यांनी एअरटेल ५जी प्लस च्या लाँचिंग दरम्यान माहिती दिली होती. एअरटेल ५जी प्लस आगामी वर्षात लोकांची कम्यूनिकेशन, राहणे, काम करणे, जोडणे, व खेळणे ही सर्व पद्धत बदलता येवू शकणार आहे. कारण, एअरटेल ५जी पल्सने हाय डेफिनिशन व्हिडिओ स्ट्रिमिंग, गेमिंग, मल्टिपल चॅटिंग, फोटोजला तात्काळ अपलोड करण्यासारखे काम सुपरफास्ट स्पीडने करू शकतील.