खजूर वाढवेल शरीराची लैंगिक ताकद, रक्ताच्या कमतरतेची तक्रारही होईल दूर, आयुर्वेदात सांगितले 15 फायदे

खजूर वाढवेल शरीराची लैंगिक ताकद, रक्ताच्या कमतरतेची तक्रारही होईल दूर, आयुर्वेदात सांगितले 15 फायदे

निरोगी आयुष्याकरता फळांचे सेवन करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. शरीराच्या उत्तम आरोग्यकरता आवश्यक असलेले सर्व पोषकतत्वे फळांमधून मिळत असतं. असंच एक जबरदस्त फळ म्हणजे खजूर. खजूरमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. याच कारणामुळे अनेकजण साखरेच्या जागी खजूराचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

खजूरमधील पोषणतत्वांमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन, विटामिन बी, विटामिन के, कॅल्शियम, आर्यन, मॅग्नेशियम, पोटेशियम, जिंक आणि मॅग्नेशियमसह वेगवेगळ्या पोषणतत्वांचे भांडार असते. खजूर खाण्याचे भरपूर फायदे असतात. या पोषणतत्वांनी भरलेल्या फळात वेगवेगळे एँटीऑक्सिडेंट असतात.

खजूर खाण्याचे फायदे खूप महत्वाचे आहेत. ज्यामुळे तुमची पचनसंस्था अधिक चांगली होती. हृदयाचं आरोग्य चांगल टिकून राहण्यास मदत होते. ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते, मेंदूचं आरोग्य देखील राखण्यास मदत होते. खजूराचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले आहेत. आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी खजूराचे फायदे सांगितले आहे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

खजूराचे आयुर्वेदिक गुण

रस (स्वाद) – मधुरा (मीठ)

गुण (गुण) गुरू (पचनाकरता महत्वाचे) स्निग्धा (प्रकृतीत त्रासदायक)

विपाक (पचनानंतरचा प्रभाव) – मधुरा (गोड)

वीर्य (शक्ती) – शीतला (थंड)

कर्म (कृती) – वातपित्त शामक म्हणून काम करते (उग्र वात आणि पित्त कमी करते) आणि बल्य (शक्ती प्रदान करते)

आयुर्वेदानुसार खजूर खाण्याचे फायदे

 • बद्धकोष्ठता रोखण्यास मदत होते
 • हृदयाचे आरोग्य सुधारते
 • कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते
 • हाडांचे आरोग्य सुधारते
 • रक्तदाब नियंत्रित करते
 • स्त्री आणि पुरुष दोघांची लैंगिक शक्ती वाढवते
 • मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देते
 • थकवा दूर होतो
 • अशक्तपणासाठी सर्वोत्तम
 • निरोगी वजन वाढण्यास प्रोत्साहन देते
 • मूळव्याध टाळण्यासाठी उपयुक्त
 • जळजळ कमी होते
 • निरोगी गर्भधारणेसाठी मदत करते
 • तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी सर्वोत्तम
 • ताकद आणि स्टॅमिना वाढवण्यास मदत होते

  खजूर खाण्याचे फायदे

  खजूर खाण्याची योग्य वेळ

 • खजूर खाण्याची सर्वात चांगली वेळ
 • सकाळी उपाशी पोटी खजूर खाणे
 • जेव्हा ही तुमचं गोड खाण्याचं मन करेल
 • झोपताना तूपासोबत खावे खजूर, वजन वाढण्यास होतो फायदा

दररोज किती खजूर खावेत

कोणत्याही पदार्थाच अधिक सेवन फायद्याच्या जागी नुकसान ही करू शकतं. त्यामुळे खजूर खाताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक डॉक्टरनुसार, दररोज दोन ते तीन खजूर खाणे गरजेचे आहे. ज्या लोकांना वजन वाढवायचं असेल त्यांनी दररोज 4 खजूर खावेत.

​खजूर भिजवून खाण्याचे फायदे

खजूर भिजवल्याने त्यातील टॅनिन किंवा फायटिक अ‍ॅसिड निघून जाते, ज्यामुळे त्यातील पोषकद्रव्ये शोषून घेणे सोपे होते. भिजवल्याने ते पचायलाही सोपे जाते. त्यामुळे जर तुम्हाला खजूर चाखायचा असेल आणि त्यातून मिळणारे पोषणही शोषून घ्यायचे असेल, तर त्या खाण्यापूर्वी रात्रभर (8-10 तास) भिजवून ठेवा.

खजूर लहान मुलांसाठी फायदेशीर

मुलांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खजूर सर्वोत्तम आहेत. कमी वजन, कमी हिमोग्लोबिन आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या मुलांनी दररोज एक गोड खजूर खावे. हे 2-3 महिन्यांकरता खजूर खाणे फायदेशीर असू शकते.