Indian Idol 13 च्या स्पर्धकाला इन्स्टावर फॉलो करतो विराट कोहली, गायकाला खास मेसेज करत म्हणाला..

Indian Idol 13 च्या स्पर्धकाला इन्स्टावर फॉलो करतो विराट कोहली, गायकाला खास मेसेज करत म्हणाला..

Indian Idol 13: देशाचा सगळ्यात मोठा सिंगिंग रिअॅलिटी शो म्हणून इंडियन आयडलकडे पाहिलं जातं. हा शो त्याच्या पहिल्या सिझनपासून चर्चेत राहिला आहे. यंदाचा १३ वा सिझनही अनेक कारणांनी चर्चेत आहे. शो मधील गायकांच्या गाण्याला जगभरातून पसंती मिळताना दिसत आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का की भारतीय क्रिकेटर विराट कोहली देखील इंडियन आयडल १३ चा स्पर्धक ऋषि सिंगचा चाहता बनला आहे. विराटला त्याचं गाणं इतकं आवडलं की त्यानं चक्क त्याला मेसेज करुन ते कळवलं.(Indian Cricketer Virat Kohli follow Indian idol 13 contestant on Instagram,also message Rishi Singh)

ऋषि सिंग ऑडिशन राऊंडपासूनच आपल्या दमदार आवाजानं आणि सुंदर गाण्यानं परिक्षकांचे मन जिंकत आलाय, अर्थात यात चाहतेही सामिल आहेत बरं का. ऋषि सिंगच्या आवाजाची जादू मात्र इतकी काम करुन गेली की चक्क भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला देखील त्याची प्रशंसा करण्यापासून राहावलं नाही.

विराट कोहलीनं इंडियन आयडल १३ चा स्पर्धक ऋषि सिंगच्या गाण्यावर भाळून त्याला इन्टग्रामवर एक पर्सनल मेसेज केला आहे. विराट कोहलीने ऋषि सिंगला इन्स्टाग्रामवर मेसेज करत लिहिलं आहे की- ”हॅलो ऋषि…कसा आहेस तू? मी नुकताच तुझा एक गातानाचा व्हिडीओ पाहिला. तु खूपच सुंदर गातोस. मला तुझी गायकी खूप आवडली. तुला खूप खूप शुभेच्छा”. विराटने पुढे लिहिलं आहे की, ”असाच गात रहा,पुढे जात रहा, देव तुझ्यासोबत असेल”.

बरं हा मेसेज सिलसिला इथेच नाही थांबला. तर कदाचित आपल्याला हे ऐकून विश्वास नाही बसणार पण खरंय हे. जो विराट कोहली जगातल्या दिग्गज खेळाडूंपैकी एक म्हणून गणला जातो. ज्याचे इन्स्टाग्रामवर २१६ मिलियन फॉलोअर्स आहेत. तो विराट कोहली इन्स्टाग्रामवर फक्त २५५ लोकांना फॉलो करतो ज्यातील एक इंडियन आयडल १३ चा हा स्पर्धक ऋषि सिंग आहे. अहो भाग्य म्हणावे नाही का.

कोणत्याही उभरत्या कलाकाराला जागतिक पातळीवरचा प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहलीकडून कामाची दाद मिळावी यापेक्षा दुसरा आनंद तो काय. ऋषि सिंगनं शो ची ट्रॉफी जिंकल्यासारखेच आहे की हे. विराटच्या या मेसेजमुळे फक्त ऋषि सिंग नाही तर इंडियन आयडल १३ ची संपूर्ण टीम खूश झाली आहे.

ऋषि सिंह यंदाच्या सिझनचा विनर बनेल की नाही हे येणारा काळच सांगेल. पण सध्या तो जिंकल्याहून अधिक आनंदाचा अनुभव घेत असणार हे नक्की.