Munmun Dutta: ‘तो मला चुकीच्या जागी…’ तारक मेहताची बबिता बोलली!

Munmun Dutta: ‘तो मला चुकीच्या जागी…’ तारक मेहताची बबिता बोलली!

Munmun Dutta Me Too: तारक मेहतामध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री म्हणून बबिताचे अर्थात मुनमुन दत्ताचे नाव घ्यावे लागेल. अनेक वर्षांपासून या अभिनेत्रीनं स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता बबितानं सोशल मीडियावर जी पोस्ट शेयर केली आहे त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. यापूर्वी देखील बबितानं शेयर केलेल्या पोस्टला तिच्या चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आताही तिनं मी टू विषयी जे स्वताचे अनुभव सांगितले आहे त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्स लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

सोशल मीडियावर बबिताचा जलवा हा नेहमीच चाहत्यांना आकर्षित करुन गेला आहे. इंस्टावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. बबितानं आपल्यासोबत जो प्रसंग घडला त्याविषयी सांगत चाहत्यांना धक्का दिला आहे. देशामध्ये अशा अनेक महिला, मुली आहेत ज्यांना मी टू च्या प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. त्यांना आधार देण्याचे काम बबितानं केलं आहे. तिनं एक भली मोठी पोस्ट करुन आपल्याबाबत जे काही घडलं त्याविषयी सांगितलं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

आतापर्यत बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींना कशाप्रकारे मी टू चा सामना करावा लागला हे दिसून आले आहे. त्यात टीव्ही मनोरंजनमधील अभिनेत्रींनी देखील आता आपल्यासोबत काय झाले हे सांगितले आहे. वास्तविक बबितानं बऱ्याच वर्षांपूर्वी जे झालं ते सांगून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. माझ्यासोबत जे झालं ते त्यावेळी कुणाला सांगण्यासारखे नव्हते. मी ते सांगुनही कुणी विश्वास ठेवला नसता. मुलींने हे सांगणं तिच्या करिअरसाठी धोकादायक असते. लोकं तिच्याविषयी जे नाही ते बोलू लागतात. त्यामुळे मोठे प्रश्न तयार होतात.

मुनमुनने इंस्टावर शेयर केलेल्या त्या पोस्टमध्ये वेदनादायी आठवणींचा उल्लेख केला आहे. महिलांना नको त्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. अनेकजणी शांत बसणं योग्य समजतात. त्यात आपल्याला गृहित धरलं जातं. मलाही एकानं असाच त्रास दिला होता. त्यानं मला नको त्या जागी स्पर्श करुन अपमानित केले होते. मला त्या गोष्टीचा खूप धक्का बसला. हे त्यावेळी कुणाला सांगता आले नसते. आजही ही गोष्ट सांगताना खूप धाडस करावं लागतंय. असे बबितानं सांगितलं आहे.