Weight Loss : वेटलॉसचा शॉर्टकट आहेत ‘हे’ 6 सोपे उपाय, फॉलो न केल्यास जिम-डाएट करूनही एक इंचही घटणार नाही वजन..!

Weight Loss : वेटलॉसचा शॉर्टकट आहेत ‘हे’ 6 सोपे उपाय, फॉलो न केल्यास जिम-डाएट करूनही एक इंचही घटणार नाही वजन..!

शरीराचे वजन योग्य असणे हे तुमच्या हेल्दी आणि दीर्घायुषी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पण आज अशी स्थिती आहे की दर तीन पैकी एक व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहे. लठ्ठपणा (Obesity and Fat) आज सुद्धा आपल्याकडे एक साधी समस्या म्हणून पाहिली जातो पण खरं पहायला गेलं तर हा एक गंभीर आजार आहे. अनेकदा तर लठ्ठपणा एवढा वाढत जातो की आता जिवंत राहायचे असेल तर व्यक्तीला वजन कमी करण्याशिवाय दुसरा पर्यायाच नसतो.

अशावेळी आपले वय, उंची आणि लिंग यानुसार योग्य वजन संतुलित राखणे महत्वाचे झाले आहे. सध्या वेटलॉससाठी अनेक जण अनेक उपाय सांगतात. काही जाहिराती तर फसव्या सुद्धा असतात. त्यामुळे योग्य पर्याय कोणता हे ओळखणे नक्कीच मुश्कील होऊन बसते. आज आपण या लेखातून जाणून घेऊया की अशा कोणत्या सवयी आहेत ज्या सुधारल्याने तुमचे वजन लवकर कमी होऊ शकते.

काय आणि किती खावे?

वजन कमी करण्यासाठी खाण्यात तडजोड करणे हा एक चांगला मार्ग मुळीच नाही. यामुळे तुम्ही शरीराला मिळणे पोषक घटकच संपवून टाकता. कमी जेवल्याने वजन कमी होते असे अजिबात समजून नका यामुळे पूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. तुम्ही यापेक्षा सर्व पदार्थ हे कमी प्रमाणात खाण्यावर भर द्यायला हवा. याचा अर्थ असा की तुमच्या आहारात प्रोटीन, मांस, फायबर, भाज्या आणि र जटिल कार्बोहाइड्रेट असलेच पाहिजेत.

खाताना केवळ खाण्यावर लक्ष द्या

अनेक लोकांना जेवताना फोन किंवा टीव्ही पाहण्याची सवय असते. पण ही अगदीच वाईट सवय आहे हे लक्षात घ्या. जेव्हा तुमचे लक्ष जेवणापेक्षा दुसऱ्या गोष्टीत असते तेव्हा तुम्ही प्रमाणापेक्षा आणि भुकेपेक्षा जास्त खाता आणि त्याचा थेट परिणाम हा वजनावर होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही काहीही खाता तेव्हा समोर काही ठेवू नका. गप्पा मारत जेवण केले तरी चालेल पण अन्य ठिकाणी लक्ष विचलित होऊ देऊ नका.

उशिरा रात्री जेवू नका

उशिरा रात्री जेवण केल्याने तुमच्या आरोग्यावर मोठा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमचे वजन कमी करण्याचे प्रयत्न सुद्धा कमी पडू शकतात. रात्री जेव्हा भूक लागते तेव्हा लोक जास्तीत जास्त प्रोसेस्ड फूड खातात आणि ते आरोग्यासाठी अगदीच वाईट असते. यामुळे झोपेवर परिणाम होतोच आणि वजन देखील अधिक वेगाने वाढू लागते. हेच कारण आहे की डॉक्टर आणि जाणकार सुद्धा झोपण्याच्या 3 तास आधीच जेवण करण्याचा सल्ला देतात.

अन्न 32 वेळा चावून खा

जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करता तेव्हा एक घटक अजिबात विसरू नका तो म्हणजे नेहमी अन्न हे चावूनच खावे. यामुळे तुम्ही किती प्रमाणात अन्न खाल्ले आहे ते लक्षात ठेवण्यास मेंदूला सुद्धा मदत होते. यामुळे कॅलरीची मात्रा देखील कंट्रोल मध्ये राखता येते. याचाच थेट फायदा वजन नियंत्रण करण्यात होतो. अनेक निरीक्षणांमधून दिसून आले आहे की ज्या लोकांना जास्त वजनाची समस्या असते ते सामान्य लोकांच्या तुलनेत कमी अन्न चावून खातात.

बाहेरचे अन्न कमी खा

घरच्या जेवणापेक्षा स्वस्थ जेवण कोणतेच नसते हे लक्षात ठेवा आणि हेच जेवण तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करू शकते. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात हीच गोष्ट लोक मिस करतायत आणि त्यामुळेच लठ्ठपणाच्या समस्या वाढत चालल्या आहेत. बाहेरचे जंक फूड वा कोणतेही अन्न हे स्वच्छ नसते ते शरीरासाठी घातक तर असतेच, पण त्यात अनेकदा अशा गोष्टींचा समावेश केलेला असतो की ज्यामुळे वजन वाढीस लागते. त्यामुळे दिवसातील एक जेवण तरी घरचे करा. घरचे अन्न पदार्थ खा. एका निरीक्षणातून हे दिसून आले आहे की घरचे जेवण करणारे लोक बाहेर खाणाऱ्या लोकांच्या तुलनेत 200 कॅलरी कमी खातात.

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा वा औषधाचा दावा केला जात नाही. अधिक माहितीसाठी आणि योग्य सल्ल्यासाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशीच संपर्क करा.