ब्रह्मास्त्रला बॉक्सऑफिसवर हादरा, या कारणामुळे कलेक्शन घसरणार..

Home » ब्रह्मास्त्रला बॉक्सऑफिसवर हादरा, या कारणामुळे कलेक्शन घसरणार..
ब्रह्मास्त्रला बॉक्सऑफिसवर हादरा, या कारणामुळे कलेक्शन घसरणार..

box office: बॉक्स ऑफिसवर सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असून त्यांच्यामध्ये कमाईसाठी बराच संघर्ष सुरू आहे. हिंदी चित्रपटसृष्टीपासून ते दाक्षिणात्य चित्रपटांपर्यंत सर्वच चित्रपट एकमेकांच्या स्पर्धेत उतरलेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या बॉलीवुड चित्रपटाला आता ‘सीता रामम’ सारखा दाक्षिणात्य चित्रपट आव्हान देत आहे. शिवाय इतरही दर्जेदार चित्रपट रिलीज झाले असून यामुळे ‘ब्रह्मास्त्र’ ला मोठा हादरा बसणार आहे. जाणून घेऊया बॉक्स ऑफिसवर नेमकं काय सुरू आहे.. ब्रह्मास्त्र – रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची प्रमुख ब्रह्मास्त्र रिलीज झाल्यापासून चांगली कामगिरी करत आहे. प्रचंड विरोध आणि वादानंतरही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करत अनेक रेकॉर्ड तोडले. मात्र, आता चित्रपटाची चमक कमी होताना दिसत आहे. वास्तविक, दोन आठवड्यांनंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये सातत्याने घट होत आहे. त्याचवेळी बुधवारच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर आदल्या दिवशीही चित्रपटाच्या कमाईत घट झाली होती. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने १३व्या दिवशी केवळ 3.40 कोटींची कमाई केली आहे, त्यानंतर या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 227.30 च्या आसपास पोहोचले आहे. Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर49 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त50 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.50 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम56 minutes agoवेंदु थनिधाथु कडू – ‘वेंधु थानिधाथु कडू’ या दाक्षिणात्य चित्रपटाची चमकही बॉक्स ऑफिसवर ओसरताना दिसत आहे. रिलीज होताच थैमान घालणाऱ्या या चित्रपटाला आता चांगलाच फटका बसताना दिसत आहे. चित्रपट आतापर्यंत ३० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचे दिसते. दरम्यान, बुधवारी चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे तर, VTK या नावाने प्रसिद्ध असलेल्या या तमिळ चित्रपटाने सातव्या दिवशी केवळ 1.35 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई 28.36 कोटींवर पोहोचली आहे. मान्सून राग – एस रवींद्रनाथ दिग्दर्शित मान्सून राग हा कन्नड चित्रपटही बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करत नाहीये. सुरुवातीपासूनच संथ कमाई करणाऱ्या या चित्रपटात अभिनेता धनंजय आणि अभिनेत्री रचिता राम मुख्य कलाकारांच्या भूमिकेत दिसत आहेत. त्याचवेळी, बुधवारी कमाईबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने रिलीजच्या सात दिवसांत केवळ 0.93 कोटींचा व्यवसाय केला आहे. सिया – विनीत कुमार सिंगचा ‘सिया’ हा चित्रपट बलात्कार पीडित मुलीच्या कथेवर आधारित आहे. मनीष मुंद्रा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती दृष्यम फिल्म्सच्या बॅनरखाली झाली आहे. या चित्रपटात विनीत कुमार सिंगसोबत पूजा पांडे मुख्य भूमिकेत आहे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करत नाहीये. या चित्रपटाने आतापर्यंत सात दिवसांत 4.45 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सीता रामम – दुल्कर सलमान आणि मृणाल ठाकूर अभिनीत तेलगू चित्रपट ‘सीता रामम’ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. चित्रपटाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित केला आहे. त्याचवेळी चित्रपटाच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत चित्रपटाने १०५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे बजेट 30 कोटी होते.

Leave a Reply

Your email address will not be published.