Health tips : ‘ही’ गोष्ट अती प्रमाणात खात असाल तर लवकरच व्हाल म्हातारे

Home » Health tips : ‘ही’ गोष्ट अती प्रमाणात खात असाल तर लवकरच व्हाल म्हातारे
Health tips : ‘ही’ गोष्ट अती प्रमाणात खात असाल तर लवकरच व्हाल म्हातारे

गणेशोत्सवात रोजच्या आरतीनंतर प्रसाद काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. बाप्पाच्या प्रसादावर सगळेच तुटून पडतात. प्रसादाच्या नावाखाली अतिप्रमाणात गोड पदार्थ खाल्ले जातात. मात्र जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. अती गोड पदार्थ तूम्हाला वेळेआधीच म्हातारे बनवू शकते. आज आपण जास्त गोड खाल्ल्याने होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जाणून घेणार आहोत…. (Why sugar is bad for health)मधुमेहाला आमंत्रणजास्त गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेह होतो. हे रक्तातील साखर वाढणे मेंदूसाठी हानिकारक असून मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात ग्लुकोज पोहोचत नाही. त्यामूळे मेंदू नीट काम करू शकत नाही. परिणामी स्मरणशक्तीही कमी होते. 175 हून अधिक देशांतील लोकसंख्येच्या सर्वेमध्ये असे आढळून आले की, मधुमेह होण्याचा धोका दररोज सेवन केलेल्या 150 कॅलरी साखरेमूळे 1.1% वाढतो.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर27 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त28 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.28 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम34 minutes agoवृद्धत्वाचा धोकाप्रत्येकालाच तरूण दिसायला आवडते. त्यामूळे प्रत्येकजण काळजी घेताना दिसतो. पण, जास्त गोड खाण्याची सवय तुम्हाला वयाच्या आधी म्हातारे बनवू शकते. जास्त साखर खाल्ल्याने शरीरात इंफ्लेमेटरी इफेक्ट निर्माण होतो, ज्यामुळे त्वचेवर पुरळ, वृद्धत्व आणि सुरकुत्या या समस्या निर्माण होतात.हेही वाचा: Health Tips : आयर्न-कॅल्शिअम वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ स्त्रियांच्या आहारात असलेच पाहिजेत! हृदयविकार होईलजास्त साखर खाणे आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे हार्ट स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. गोडामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढते. या गोष्टी हाताबाहेर गेल्याने हृदयविकार वाढतो. 30,000 लोकांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, साखरेमूळे ज्यांच्या 17-21% कॅलरी अतिरिक्त वाढल्या आहेत त्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका 38% अधिक आहे.कॅन्सरचा धोकाजास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. साखरचे पदार्थ आणि पेय लठ्ठपणा वाढवतात, ज्यामुळे तुमचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. साखर आपल्या शरीरात सूज वाढवते. त्यामूळे इन्सुलिन प्रतिरोध देखील होऊ शकते, या दोन्हीमुळे कर्करोगाचा धोका वाढतो. 4,30,000 हून अधिक लोकांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, साखरेचे सेवन केल्याने अन्ननलिका, फुफ्फुस आणि लहान आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.लठ्ठपणा वाढतोआज प्रत्येक दुसरा व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त आहे. ही सर्वात सामान्य परंतु गंभीर समस्या आहे. त्यामुळे अनेक आजार बळावतात. आपण जास्त साखर खाल्ल्यास आपले शरीर लिपोप्रोटीन लिपेज तयार करू लागते जे आपल्या पेशींमध्ये चरबी साठवते. अतिरीक्त चरबी साचून राहिल्याने वजन नियंत्रणात येत नाही.हेही वाचा: पांढऱ्या रंगाचे लेदरचे शूज स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स, येईल चमक रोगप्रतिकारक शक्ती कमी होतेप्रतिकारशक्तीची गरज किती आहे हे कोरोना काळात सर्वांनीच अनुभवले आहे. त्यामूळे रोगप्रतिकारक शक्तीसाठी गोड खाणे चांगले नसते. गोड पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत बनवतात त्यामूळे तूम्ही लवकर आजारी पडू शकता.फॅटी लिव्हरची समस्यागोड खाणे यकृतासाठी धोक्याचे असते. त्यामुळे यकृतावर प्रभाव पडतो आणि शरीरात लिपिड्सची निर्मिती वाढते. त्यामुळे फॅटी लिव्हर डिसिज होण्याचा धोका असतो. 5,900 हून अधिक वृद्धांच्या सर्वेत असे दिसून आले आहे की, जे दररोज साखरयुक्त पेये घेतात त्यांना ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ (एनएएफएलडी) होण्याचा धोका 56% जास्त असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.