Dry eye disease : स्क्रिन करतोय मुलांचे डोळे कोरडे

Home » Dry eye disease : स्क्रिन करतोय मुलांचे डोळे कोरडे
Dry eye disease : स्क्रिन करतोय मुलांचे डोळे कोरडे

मुंबई : अधिक काळ लॅपटॉप, टीव्ही किंवा मोबाईलच्या स्क्रिनकडे पाहिल्यामुळे डोळे कोरडे पडत असल्याची तक्रार अनेक नोकरदार व्यक्ती करत असतात. कोरोना कालावधीत घरूनच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही ही समस्या आढळून आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, आता शाळा-महाविद्यालये नियमितपणे सुरु झाले असले तरी ही समस्या विद्यार्थ्यांमध्ये अजूनही दिसून येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. नोकरदार, विद्यार्थी, विविध स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारे आणि गृहिणींचाही ‘स्क्रिन टाईम’ वाढला आहे. लॅपटॉपवर सलग बराच वेळ काम करणे, एकाच वेळी मोबाईल आणि लॅपटॉपवर काम करणे, सलग सहा ते सात तास ऑनलाइन शिक्षण घेणे अशा काही कारणांमुळे हा ‘स्क्रिन टाईम’ वाढला आहे. डोळे कोरडे पडणे म्हणजे काय?आपल्या डोळ्यांमध्ये अश्रूंचा पडदा असतो. त्यामुळे डोळे ओलसर राहतात. हा पडदा डोळ्यांचे सुरक्षा कवच म्हणून काम करतो. आपण ज्यावेळी सातत्याने स्क्रिनकडे पाहतो, त्यावेळी डोळ्यांवर ताण येतो आणि त्यामुळे डोळ्यांतून पाणी येते. कालांतराने डोळ्यांत योग्य प्रमाणात पाणी तयार न होणे, अश्रू लवकर वाळणे असे प्रकार घडतात आणि डोळे कोरडे पडतात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. लहान मुलांना डोळ्यांच्या समस्येबद्दल नीटसे सांगता येत नाही. ते डोळे चोळत बसतात. त्यामुळे पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.उघडझाप होण्याचे प्रमाण घटतेसंगणकाच्या स्क्रिनकडे पाहत असताना डोळ्यांची नियमित होणारी उघडझाप ६६ टक्क्यांनी कमी होते. डोळ्यांच्या निरोगीपणासाठी ही उघडझाप आवश्‍यक असते.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर27 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त28 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.28 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम34 minutes agoसमस्येपासून मुलांना दूर कसे ठेवावे?संगणकावरच मुलांचा अभ्यास असेल तर त्यांना नियमित कालावधीने विश्रांती घ्यायला लावावीमोबाईल अथवा संगणकावरील गेम हे प्रमाण कमी करावेडोळ्यांत जळजळ निर्माण करणाऱ्या धुरापासून दूर ठेवावेगॉगल-चष्म्याचा वापर करावारोज सकाळी मुलांच्या डोळ्यांवर ओलसर कपड्याची पट्टी थोडा वेळ ठेवावी.संगणक स्क्रिनपासून त्यांना किमान २० ते २५ इंच दूर बसून काम/अभ्यास करण्याची सवय लावावीअधिक त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावाआहारात या गोष्टींचा समावेश कराहिरव्या पालेभाज्या : ‘क’ जीवनसत्त्व डोळ्यांसाठी उपयुक्तसोयाबिन : फायबर आणि प्रथिनसमृद्ध असतातमासे : यातील ओमेगा-३ हे स्निग्धाम्लामुळे जळजळ कमीपाणी : योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्‍यकलहान मुलांमधील डोळे कोरडे पडण्याचे प्रमाण३ टक्के – कोरोना काळापूर्वी६७ टक्के – कोरोना काळानंतरलहान मुलांमध्ये मोबाईल बघण्याचं प्रमाण वाढल्याने त्यांच्यामध्ये डोळे कोरडे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना उद्रेकाच्या आधी लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण अत्यल्प होते. पण, आता बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या दहापैकी पाच मुलांची डोळे कोरडे होणे ही तक्रार असते.- डॉ. जाई केळकर, नेत्ररोग तज्ज्ञ

Leave a Reply

Your email address will not be published.