Queen’s residence in London: 775 रूम्स असलेला लंडनच्या राणीचा बकिंगहॅम पॅलेस

Home » Queen’s residence in London: 775 रूम्स असलेला लंडनच्या राणीचा बकिंगहॅम पॅलेस
Queen’s residence in London: 775 रूम्स असलेला लंडनच्या राणीचा बकिंगहॅम पॅलेस

कितीही भव्य बंगले, टॉवर उभे केले तरी, ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या बकिंगहॅम पॅलेसपुढे सगळेच फिके पडते. अगदी गोष्टीतला महाल असतो त्याहून सुंदर असा हा महाल आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नुकतेच निधन झाले आहे. राणी एलिझाबेथ यांनी 70 वर्षे ब्रिटनवर राज्य केले. त्या लंडनच्या रॉयल पॅलेसमध्ये राहत होत्या. या पॅलेसला बकिंगहॅम पॅलेस (Buckingham Palace) म्हणून ओळखले जाते. एलिझाबेथ यांच्याकडे विंडसर कॅसल(Windsor Castle), सँडरिंगहॅम हाऊस आणि बालमोरल (Sandringham House and Balmoral) ही निवासस्थाने आहेत. पण, बकिंगहॅम पॅलेस राणी एलिझाबेथ यांचा आवडता होता. एलिझाबेथ यांनी संपूर्ण जीवन याच राजवाड्यात व्यतीत केले. पाहुयात या पॅलेसबद्दल काही खास वैशिष्ट्ये…● बकिंगहॅम पॅलेस लंडनच्या मध्यभागी असून तो भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. हा पॅलेस आतून अलिशान असून त्याच्या बाहेरील बाजूस विक्टोरिया ट्युब स्टेशन, ग्रीन पार्क आहेत. पॅलेसचे गार्डन 39 एकरांवर विस्तारलेले आहे. या बागेत 350 हून अधिक विविध प्रकार आहेत. या पॅलेसमध्ये पोहोचण्यासाठी बस आणि ट्रेनची सोय आहे.● रॉयल कलेक्शन ट्रस्ट या वेबसाइटनुसार, 1937 पासून बंकिंगहम पॅलेस ब्रिटीश राज्यकर्त्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. दरवर्षी उन्हाळ्यात हा पॅलेस पर्यटकांसाठी खुला करण्यात यातो. या पॅलेसची किंमत 3.7 बिलियन पाउंड इतकी आहे.● रॉयल कलेक्शन ट्रस्टवरील माहितीनुसार, बकिंगहॅम पॅलेसमध्ये 829,000 चौरस फूट जागेवर उभा आहे. एकूण 775 रुम्स आहेत, ज्यात 19 स्टेटरूम तसेच 52 रॉयल आणि गेस्ट रूम्स आहेत. घरातील कर्मचाऱ्यांसाठी 188 रूम, 92 ऑफिस तर 78 बाथरूम आहेत. या चर्च, पोस्ट ऑफिस, इनडोअर स्विमिंग पूल, स्टाफ कॅफेटेरिया, डॉक्टर्स ऑफिस आणि मूव्ही थिएटरही आहेत.हेही वाचा: राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी होणार अंत्यसंस्कार ● शाही भोजन, समारंभ, रिसेप्शन यासाठी दरवर्षी 50 हजार हुन अधिक लोक सहभागी होतात. ब्रिटनचे पंतप्रधानांसोबत मिटींग आणि विदेशी पाहुण्यांचे स्वागतही याच महालात केले जाते. या पॅलेसमध्ये अनेक राष्ट्रीय परेड आणि कार्यक्रम होतात.● आता बघू पॅलेसचा थोडक्यात इतिहासबकिंगहॅम हाउस 1762 पर्यंत ड्युक ऑफ बकिंगहॅमची संपत्ती होती. जॉर्ज तिसरा यांनी बकिंगहॅम हाऊस त्याची पत्नी राणी चार्लोट आणि मुलांसाठी विकत घेतले. 1820 मध्ये राजा झाल्यानंतर जॉर्ज चौथे यांनी वास्तुविशारद जॉन नॅश यांच्या मदतीने या घराचे राजवाड्यात रूपांतर केले. महाराणी व्हिक्टोरिया 1837 मध्ये या पॅलेसमध्ये रहायला आल्या. 1840 मध्ये प्रिंस अल्बर्ट आणि व्हिक्टोरिया यांचा विवाह झाल्यानंतर या पॅलेसमध्ये बरेच बदल करण्यात आले.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ4 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या7 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप10 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 14 minutes ago