Technology ; iPhone 14 Discount : भन्नाट ऑफर ! आयफोनवर मिळवा बंपर डिस्काउंट

Home » Technology ; iPhone 14 Discount : भन्नाट ऑफर ! आयफोनवर मिळवा बंपर डिस्काउंट
Technology ; iPhone 14 Discount : भन्नाट ऑफर ! आयफोनवर मिळवा बंपर डिस्काउंट

तुम्ही आयफोन 14 सीरीजचं (iPhone 14 series) मॉडेल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला नवीन iPhone वर मोठी बचत करण्याची संधी मिळणार ​​आहे. नवीन आयफोनच्या बुकिंगवर तुम्ही मोठ्या सवलतींचा लाभ घेऊ शकता. अलीकडेच Apple ने नवीन iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे. ज्यात iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल लॉन्च करण्यात आले आहेत. मल्टिपल या प्लॅटफॉर्मने सेव्ह नाऊ बाय लेटर या बॅनरखाली आयफोन 14 मालिकेवर सूट जाहीर केली आहे. आयफोन 14 सीरिजवर सूट..कंपनीने म्हटलय की आयफोन 14,आयफोन 14 प्लस,आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्सवर 5% सवलत दिली जाईल.ही डील भारतातील ग्राहकांसाठी चांगली असेल. आयफोनवर ही सूट फक्त मल्टिपल या कंपनीच्या वेबसाईटवर मिळणार आहे.आयफोन 14 ची किंमत 79,900 रुपये आहे.तर आयफोन 14 प्लससाठी 89,900 मोजावे लागणार आहेत.पण हेच मल्टिपल वेबसाईटच्या डिस्काउंटनंतर, तुम्हाला आयफोन 14 केवळ 75,905 रुपयांमध्ये तर आयफोन 14 प्लस 89,900 रुपयांऐवजी 85,405 रुपयांमध्ये मिळून जाईल.आयफोन 14 प्रो ची ओरिजिनल किंमत आहे 1,29,900 तर आयफोन 14 प्रो मॅक्सची किंमत आहे 1,39,900 रुपये. पण मल्टिपलवर आयफोन 14 प्रोची किंमत 1,23,405 रुपये असेल. तर आयफोन 14 प्रो मॅक्ससाठी ही किंमत 1,32,905 रुपये असेल.जुन्या आयफोनवरही सूटतसेच तुम्हाला जुन्या आयफोनवर ही सूट मिळू शकते. मॅपल स्टोअर्स आणि वेबसाइट्सवरून 5% सूट दिली जात आहे. मल्टीपल वेबसाइट आणि मॅपल स्टोअर्सवर अॅपलच्‍या जुन्या उत्‍पादनांवर 10% सवलत मिळते आहे.म्हणजे तुम्हाला आयफोन 13 खरेदी करायचा असेल तर तो तुम्ही 69,900 रुपयांऐवजी केवळ 61,022 रुपयांना खरेदी करू शकता. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना मल्टीप्ल अॅपवर सेवींग प्लॅन क्रिएट करावा लागणार आहे. प्लॅन तयार केल्यानंतर ही ऑफर फक्त 3-12 महिन्यापर्यंतच वैध असेल. नवीन ऍपल फोन आता प्री-ऑर्डर करता येऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.