iPhone 14 Pro:’स्टेटसचा खेळ’! बॉलीवूड सेलिब्रेटींना iPhone 14 Proची भूरळ

Home » iPhone 14 Pro:’स्टेटसचा खेळ’! बॉलीवूड सेलिब्रेटींना iPhone 14 Proची भूरळ
iPhone 14 Pro:’स्टेटसचा खेळ’! बॉलीवूड सेलिब्रेटींना iPhone 14 Proची भूरळ

iPhone14 Pro – मनोरंजन विश्वाला टेक्नो क्लाउडमध्ये काय सुरु आहे याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. सध्या आयफोन 14 प्रो ची मोठी क्रेझ आहे. आयफोनच्या प्रत्येक फोनविषयी नेहमीच युझर्सला (bollywood celebrity) कुतूहल असते. या युझर्समध्ये बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींचा देखील समावेश आहे. सोशल मीडियावर बॉलीवूड आणि टॉलीवूडच्या कोणत्या सेलिब्रेटींनी आयफोन 14 प्रो ची खरेदी केली आहे त्यांचे फोटो व्हायरल झाले असून त्याला चाहत्यांच्या प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे.सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अॅपलच्या आयफोन 14 प्रो विषयी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. हा फोन घेण्यासाठी युझर्सची लगबगही दिसून येत आहे. अशातच बॉलीवूड आणि टॉलीवूडच्या सेलिब्रेटींना या फोनची भुरळ पडल्याचे दिसून येत आहे. आयफोनचा फिव्हर आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना देखील असल्याचे चाहत्यांना मोठे अप्रुप आहे. सोशल मीडियावर ज्या टॉलीवूड, बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी आयफोन 14 प्रो ची खरेदी केली आहे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. काहींनी खास पोस्ट शेयर करुन त्याविषयी माहितीही दिली आहे.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 1 hours agoआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.1 hours agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी2 hours agoiPhone14 Pro प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं आयफोन 14 प्रो सोबत एक फोटो शेयर करुन त्याविषयी माहिती दिली आहे. त्यानं या फोनची खरेदी केली आहे. टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता महेशबाबून आपल्या चाहत्यांना नव्या फोनविषयी अपडेट केलं आहे. त्याच्याकडे देखील आयफोन आल्यानं चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. साऊथमध्ये महेशबाबूचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं बॉलीवूडमध्ये काम करण्याविषयी एक वक्तव्य केले होते. त्यावरुन तो वादात सापडला होता.iPhone14 Pro iPhone14 Pro याशिवाय पुष्पा फेम अल्लु अर्जुननं देखील आपण आयफोन 14 प्रो चे मालक झाल्याचे सांगितले आहे. त्यानं सोशल मीडियावर त्यासंबंधी एक फोटोही पोस्ट केला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. आपल्या बोल्डनेसनं चाहत्यांना घायाळ करणाऱ्या दिशाचा आयफोन 14 प्रो अंदाज नेटकऱ्यांना भावला आहे. जान्हवीनं देखील आयफोन 14 प्रो ची खरेदी करुन त्याविषयी एक पोस्ट शेयर केली आहे. त्याचा फोटो शेयर करुन देवा किती सुंदर फोन आहे हा….असं म्हटलं आहे. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीनं आयफोन 14 प्रो घेऊन आपण सध्या भलत्याच आनंदात असल्याचे म्हटले आहे.