Share Market: फक्त 18 हजारात गुंतवणुकदार बनले कोट्यधीश, ‘या’ शेअरचा छप्परफाड रिटर्न

Home » Share Market: फक्त 18 हजारात गुंतवणुकदार बनले कोट्यधीश, ‘या’ शेअरचा छप्परफाड रिटर्न
Share Market: फक्त 18 हजारात गुंतवणुकदार बनले कोट्यधीश, ‘या’ शेअरचा छप्परफाड रिटर्न

युपीएल लिमिटेड (UPL Ltd) ही भारताबरोबरच जगातील सर्वात मोठ्या ऍग्रोकेमिकल कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या 2 दशकांमध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे आणि त्यांना कोटींचा नफा मिळवून दिला आहे. ज्या गुंतवणुकदारांनी या शेअरवर विश्वास ठेऊन लाँग टर्मसाठी गुंतवणूक केली त्यांना कोट्यवधींचा फायदा झाल्याचे नुकतेच समोर आले आहे.  (share market investors became Billionaire this share give best return)

यूपीएल लिमिटेडचे नाव आधी युनायटेड फॉस्फरस लिमिटेड असे होते. ही एक भारतीय मल्टीनॅशनल कंपनी आहे जी कृषी रसायने, औद्योगिक रसायने, केमिकल इंटरमीडिएट्स आणि स्पेशालटी केमिकलचे उत्पादन आणि मार्केटिंग करते. याव्यतिरिक्त, कंपनी पीक संरक्षणाशी संबंधित उपाय देखील प्रदान करते.हेही वाचा: Share Market: अप्पर सर्किटमध्ये ‘ही’ केमिकल कंपनी; अवघ्या 5 आठवड्यात वाढले 100% शेअर्सशुक्रवारी 16 सप्टेंबर 2022 रोजी एनएसईवर युपीएल लिमिटेडचे (UPL Ltd) शेअर्स 704.55 रुपयांवर बंद झाले. पण, 20 वर्षांपूर्वी जेव्हा 5 जुलै 2022 रोजी युपीएल लिमिटेडच्या शेअर्सनी पहिल्यांदाच एनएसईवर व्यापार सुरू केला तेव्हा त्याची किंमत फक्त 1.20 रुपये होती. तेव्हापासून त्याची किंमत सुमारे 58,612.50 टक्क्यांनी वाढली आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी युपीएल लिमिटेडच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ते  58,612.50% ने वाढून 5.87 कोटी रुपये झाले असते. दुसरीकडे, एखाद्या गुंतवणूकदाराने त्यावेळी केवळ 18 हजार रुपये गुंतवले असते, तर आज त्या 18 हजार रुपयांचे 1 कोटी 5 लाख रुपये झाले असते. पण गेल्या एका महिन्यात हा शेअर सुमारे 10.87 टक्क्यांनी घसरले आहे. त्याचवेळी, गेल्या वर्षभरात त्याची किंमत सुमारे 5 टक्क्यांनी घसरली आहे. तर गेल्या 5 वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 31 टक्के परतावा दिला आहे.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव5 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 6 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.13 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ31 minutes agoहेही वाचा: Stock market: 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तज्ज्ञांचा फेव्हरीट…अरिस्ता लाईफसायन्सचे (Arysta LifeScience) अधिग्रहण केल्यानंतर यूपीएल लिमिटेड आता जगातील पाचवी सर्वात मोठी ऍग्रोकेमिकल कंपनी बनली आहे. ग्लोबल फूड सिस्टीम्समधील ही एक आघाडीची कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्याची वार्षिक कमाई 40163.56 कोटी होती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.