Queen Elizabeth II : राणीची संपत्ती गोपनीयच राहणार

Home » Queen Elizabeth II : राणीची संपत्ती गोपनीयच राहणार
Queen Elizabeth II : राणीची संपत्ती गोपनीयच राहणार

लंडन : जगातील सर्वांत श्रीमंत महिलांपैकी एक समजल्या गेलेल्या दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांची संपत्ती नेमकी किती आहे आणि त्यांनी त्यांच्या मृत्युपत्रात संपत्तीचे वाटप कसे केले आहे, हे कायम गोपनीयच राहणार आहे. ब्रिटिश राजघराण्याने सरकारसोबत केलेल्या करारानुसार या बाबी जाहीर केल्या जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. राणी एलिझाबेथ यांचे गुरुवारी (ता. ८) निधन झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीबाबत चर्चा सुरु झाली आहे. ‘ब्रँड फायनान्स’ या कंपनीने २०१७ मध्ये केलेल्या मूल्यांकनानुसार ब्रिटिश राजघराण्याची एकूण संपत्ती ८८ अब्ज डॉलर इतकी आहे. राणी एलिझाबेथ यांनी केलेली गुंतवणूक, कलात्मक वस्तू, दागिने, स्थावर मालमत्ता हे सर्व धरून त्यांची वैयक्तिक मालमत्ता ५० कोटी डॉलर असावी, असा ‘फोर्ब्ज’चा अंदाज आहे. मात्र, ती याहून अधिक असावी, असा अनेकांचा दावा आहे. राणीला सर्वाधिक उत्पन्न डची ऑफ लँकेस्टर या खासगी स्थावर मालमत्तेतून मिळते. ब्रिटिश राजघराण्याला खर्चासाठी उत्पन्न मिळावे, यासाठीच हे वतन म्हणून राजघराण्याला दिलेले आहे. या स्थावर मालमत्तेची एकूण किंमत ६५ कोटी २० लाख पौंड असून या वर्षी त्यातून अडीच कोटी पौंड उत्पन्न मिळाले.१९९३ मध्ये तत्कालीन सरकारबरोबर झालेल्या करारानुसार, राजघराण्यातील व्यक्तींना वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीवर कोणताही कर लावला जात नाही. मात्र, त्याच वर्षीपासून प्राप्तिकर भरण्याचे मात्र राणीने मान्य केले होते. इतर संपत्ती मात्र खासगीपणा जपण्यासाठी गोपनीय ठेवण्याचे सरकारने मान्य केले. राजघराण्याच्या प्रत्येक सदस्याची संपत्ती गोपनीयच ठेवली जाते.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ4 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या7 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप10 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 14 minutes ago