पतंजली चार आयपीओ आणणार; स्वामी रामदेव

Home » पतंजली चार आयपीओ आणणार; स्वामी रामदेव
पतंजली चार आयपीओ आणणार; स्वामी रामदेव

नवी दिल्ली : पतंजली समुहाने बाजारमूल्य पाच लाख कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आगामी पाच वर्षांत पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस, पतंजली मेडिसीन आणि पतंजली लाईफस्टाईल असा चार नव्या कंपन्यांची सुरवात होणार असून त्यांचे आयपीओ आणले जातील, अशी घोषणा शुक्रवारी स्वामी रामदेव यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केली. त्यांनी सांगितले की, समूहाची वार्षिक उलाढाल ४० हजार कोटी रुपयांवरून येत्या पाच वर्षांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल. पतंजली फूड्सव्यतिरिक्त नव्या चार कंपन्यांचे आयपीओ आणले जातील.पतंजलीची पाच उद्दिष्टेखाद्यतेल आयातीवरील तीन लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचविण्यासाठी १५ लाख एकरमध्ये पाम लागवड करणारपरदेशी शिक्षण आणि उपचारपद्धतीच्या गुलामगिरीतून मुक्ती देण्यात मोठी भूमिका बजावताना ‘नॅचरल न्युट्रास्युटिकल्स”साठी बहुस्तरीय विपणनाचा (मल्टी लेव्हल मार्केटिंग) नवा स्वदेशी अवतार आणणारयासाठी दहा लाख योग शिक्षकांना जोडणारजगभरात एक लाख पतंजली वेलनेस सेंटर उघडणारआगामी पाच ते सात वर्षात पतंजली फूड्सला ५००० कोटी रुपयांहून अधिक मूल्याची सर्वात मोठी ‘एफएमसीजी‘ कंपनी बनविणशंभर जणांविरुद्ध कारवाईपतंजली ब्रँडच्या बदनामीचे षडयंत्र सुरू असून १०० जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जात आहे. उपचार आणि उपकार हा आमचा परमार्थ न आवडणाऱ्यांनी बदनामीमध्ये कोणतीही कसर ठेवलेली नाही. यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या, वैद्यकीय, औषध निर्माते, राजकीय तसेच सोशल मिडियावरील माफियांचा समावेश आहे. या प्रकरणी १०० जणांना नोटीस बजावण्यात आली असून काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, असेही स्वामी रामदेव यांनी सांगितले.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव5 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 6 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.13 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ31 minutes agoतुपाबाबत मनमानी निकषांचा आरोपस्वामी रामदेव म्हणाले की, सरकारी प्रयोगशाळेकडून मनमानी निकष लावून पतंजली गायीच्या तुपाचे नमुने अपात्र दर्शविण्याचा प्रयत्न झाला. रुद्रपूरमधील ज्या प्रयोगशाळेने अपात्र ठरविलेले नमुने गाझियाबादमधील ‘नॅशनल फूड लॅबोरेटरीज”मध्ये योग्य ठरले. रुद्रपूरची प्रयोगशाळेला अशा चाचण्यांसाठी अधिकृत नसल्याचे आढळून आले. एफएसएसएआय (भारतीय अन्नसुरक्षा आणि मापदंड प्राधिकरण) च्या निकषांव्यतिरिक्तच्या निकषांचा वापर तेथे करण्यात आला. यामध्ये सरकारचा हात नाही. परंतु काही सरकारी संस्था आणि सरकारी अधिकारी यात सामील आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी.पशुधनाचे नुकसान करणाऱ्या लम्पी रोगावर इलाज शोधण्यासाठी पतंजलीतर्फे प्रयत्न सुरू आहेत. लम्पी हे भारतीय गायींना संपविण्याचे षडयंत्र आहे. कोरोना चीनमधून आला त्याप्रमाणे लम्पी पाकिस्तानातून आला आहे. सरकारने याबाबत सावध राहावे.- स्वामी रामदेव, योगगुरु