Share Market: अप्पर सर्किटमध्ये ‘ही’ केमिकल कंपनी; अवघ्या 5 आठवड्यात वाढले 100% शेअर्स

Home » Share Market: अप्पर सर्किटमध्ये ‘ही’ केमिकल कंपनी; अवघ्या 5 आठवड्यात वाढले 100% शेअर्स
Share Market: अप्पर सर्किटमध्ये ‘ही’ केमिकल कंपनी; अवघ्या 5 आठवड्यात वाढले 100% शेअर्स

Jyoti resins: स्पेशायलिटी केमिकल कंपनी ज्योती रेजिन्स अँड ऍडेसिव्ह्ज लिमिटेडचे (Jyoti Resins & Adhesives Ltd) शेअर्स बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात अप्पर सर्किट लागले आणि बीएसईवर शेअर्स 5 टक्क्यांनी वाढून 1,769.70 रुपयांवर पोहोचले. हा सलग पाचवा व्यवहार दिवस आहे, जेव्हा ज्योती रेझिन्सच्या शेअर्सनी अप्पर सर्किटमध्ये प्रवेश केला आहे आणि या काळात तो जवळपास 26 टक्क्यांनी वाढला आहे. दुपारी ज्योती रेझिन्सचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह सुमारे 1753 रुपयांवर होते.ज्योती रेझिन्सने गेल्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 80 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, केवळ 5 आठवड्यांत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत आणि त्यांना 105 टक्के परतावा दिला आहे. ज्योती रेझिन्सचे शेअर्स 2022 पासून सुमारे 380 टक्क्यांनी वाढलेत. तर गेल्या 1 वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 525 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.Recommended Articlesहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : कांगारूंचा निम्मा संघ माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours agoMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज2 hours agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु2 hours agoएखाद्या गुंतवणूकदाराने 2022 च्या सुरुवातीला ज्योती रेझिन्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्या 1 लाखाचे 4 लाख 70 हजार झाले असते. एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी ज्योती रेझिन्सच्या शेअर्समध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती, तर आज त्या 1 लाखाचे 6 लाख 26 हजार झाले असते. एखाद्या गुंतवणूकदाराने ज्योती रेझिन्सच्या शेअर्समध्ये फक्त 5 आठवड्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे दुप्पट अर्थात 2 लाख रुपये झाले असते.बोनस शेअर्स देणारज्योती रेजिन्स अँड ऍडेसिव्ह्ज लिमिटेडचे (Jyoti Resins & Adhesives Ltd) ही स्मॉल कॅप स्पेशालिटी केमिकल कंपनी असून तिचे मार्केट कॅप 2.11 हजार कोटी आहे. कंपनीने नुकतेच भागधारकांना 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली होती आणि 8 सप्टेंबरपासून त्यांचे शेअर्स एक्स-बोनस म्हणून व्यवहार करत आहेत.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.