KBC 14: अख्खा एपिसोड रडत-रडतच खेळली ‘ही’ स्पर्धक, अखेर अमिताभसमोर दिली भावूक कबूली

Home » KBC 14: अख्खा एपिसोड रडत-रडतच खेळली ‘ही’ स्पर्धक, अखेर अमिताभसमोर दिली भावूक कबूली
KBC 14: अख्खा एपिसोड रडत-रडतच खेळली ‘ही’ स्पर्धक, अखेर अमिताभसमोर दिली भावूक कबूली

KBC 14: कौन बनेगा करोडपती १४ सध्या भलताच गाजतोय ते स्पर्धकांनी आणि त्याहून अधिक अमिताभनी केलेल्या खुलाश्यांमुळे. रिअॅलिटी शो मध्ये हा सर्वात उत्तम शो मानला जातो. ज्ञानात भरही पडते आणि सगळ्याच विषयातला इंट्रेस्टही वाढतो. या खेळात दर आठवड्याला वेगवेगळे स्पर्धक हॉट सीटवर बसतात आणि अनेक प्रश्नांची उत्तरं देत मोठी रक्कमही घेऊन जतात. कोणी मध्येच अडकतं तर कोणी खेळात सुसाट पळतं.(KBC 14: Contestant cried Every moment in front of big b, said,not even cried in vidaai but get emotional in kbc…)हेही वाचा: KBC 14: विचित्र चाहत्याच्या तावडीत सापडलेले अमिताभ, मग जे घडलं ते बिग बीं कडूनच ऐका’कौन बनेगा करोडपती १४’ मध्ये १०,००० रुपयाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिल्यावर अनिकेत शंकर पाटीलनं बिग बी यांना म्हटलं की जेव्हा ते टी.व्ही पाहताना बॉलीवूड सुपरस्टारला केबीसी मध्ये पाहतात तेव्हा त्यांना भीती वाटते. त्यानंतर बिग बी यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाची प्रशंसा केल्यावर अनिकेत म्हणाले,”तुमचा एक डायलॉग मला भलताच आवडतो. परंपरा,प्रतिष्ठा और अनुसंधान. हा डायलॉग कायम माझ्या ओठांवर असतो. केबीसी कार्यक्रमातला तुमचा सहभाग मनाला खूप समाधान देऊन जातो. मी तुमच्या वयाविषयी बोलतच नाहीय सर, मी तर तुमच्या एनर्जा विषयी, उत्साही व्यक्तिमत्त्वाविषयी बोलत आहे. तुमची बरोबरी करणारा कुणीच नाही”. हे सगळं ऐकून बिग बी देखील थोडे ओशाळले.Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी2 hours agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.2 hours agoहेही वाचा: ‘त्या संध्याकाळी असं काय घडलं की घटस्फोटाचा निर्णयच बदलला..’, चारु असोपा अखेर बोललीअनिकेत नंतर आणखी एक स्पर्धक हॉट सीटवर बसली,जिचं नाव होतं आरती बजाज चुघ. एपिसोड दरम्यान आरतीनं शेअर केलं की आपल्या लग्नाच्या वेळेस पाठवणी दरम्यानही ती एवढी रडली नव्हती,पण केबीसी प्लॅटफॉर्म सगळ्यांना भावूक करून सोडतो. रडत-रडतच आरतीनं शेअर केलं की, ”हा शो मला खूप भावूक करतो, एवढं की मी माझे अश्रू देखील आवरू शकत नाही. आणि रडणं ही अशी भावना आहे ज्याला आपण आवरु शकत नाही,बस्स अश्रूंची वाट अलगद मोकळी होते”. आरती जितका वेळ शो मध्ये होत्या बस्स प्रत्येक क्षणी रडत होत्या…आणि अखेर अमिताभ समोर भावूक कबूली देखीलही त्यांनी रडत-रडतच दिली. हेही वाचा: सोनमच्या मुलासंदर्भात मोठी भविष्यवाणी, ज्योतिषी संजय जुमानी म्हणाले,’हा मुलगा पुढे..”केबीसी १४’ चा प्रीमियर रविवारी,७ ऑगस्ट २०२२ रोजी पार पडला. पहिल्या एपिसोडमध्ये बिग बी यांनी बड्या बड्या हस्तींचे स्वागत केले,जे आले होते हॉट सीटवर बसून केबीसीचा प्रश्नोत्तरांचा खेळ खेळायला. या खास पाहुण्यांत होते आमिर खान, मेरी कॉम, सुनिल छत्री सारखे स्पोर्ट्स आयकॉन,भारताचे पहिले ब्लेड रनर, मेजर डीपी सिंग आणि वीरता पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी मिताली मधुमिता देखील यात सामिल होत्या.