या कंझ्युमर गुड्स स्टॉकचा 3 महिन्यांत 40% परतावा, आता देणार 5 रुपये फायनल डिव्हिडेंड

Home » या कंझ्युमर गुड्स स्टॉकचा 3 महिन्यांत 40% परतावा, आता देणार 5 रुपये फायनल डिव्हिडेंड
या कंझ्युमर गुड्स स्टॉकचा 3 महिन्यांत 40% परतावा, आता देणार 5 रुपये फायनल डिव्हिडेंड

मुंबई : डिस्क्रेशनरी गुड्स अँड सर्व्हिसेस (CDGS) उद्योगाशी संबंधित असलेल्या स्मॉल-कॅप कंपनीच्या ट्रायटन वाल्व्हज (Triton Valves) स्टॉकने गेल्या तीन महिन्यांत जवळपास 40 टक्के परतावा दिला आहे. आता ही कंपनी 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या 50 टक्के म्हणजेच प्रति शेअर 5 रुपये फायनल डिव्हिडेंड देणार आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांत त्यांनी 23 टक्के परतावा दिला आहे. आजही ट्रायटन वाल्व्हजच्या (Triton Valves) शेअरमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे.टायर वाल्व्हचा मोठा मॅन्युफॅक्चररट्रायटन वाल्व्हस लिमिटेड ही 158.86 कोटी रुपयांच्या मार्केट व्हॅल्यूची स्मॉलकॅप कंपनी आहे, जी सीडीजीएस उद्योगाच्या व्यवसायात आहे. ट्रायटन ही भारतातील टायर व्हॉल्व्हची सर्वात मोठी उत्पादक आहे आणि हायड्रोलिक्स, खाणकाम, एअरोस्पेस आणि इंडस्ट्रियल एचवीएसीसह ग्राहकांना आणि क्षेत्रांची सेवा देते. कंपनीचे हेडक्वार्टर बंगलोरमध्ये आहे, तर आर अँड डी सेंटर आणि प्रॉडक्शन फॅसिलिटीज म्हैसूर इथे आहेत.5 रुपये डिव्हिडेंडकंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये फेस व्हॅल्यूनुसार प्रति इक्विटी शेअर 50 टक्के म्हणजे 5 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या डिव्हिडेंडची शिफारस केल्याचे कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे. मात्र, त्यासाठी कंपनीच्या एजीएममध्ये मंजुरी घ्यावी लागणार आहे.Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी1 hours agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.1 hours agoरेकॉर्ड डेटशेयरहोल्डर्सची एलिजिबिलिटी निश्चित करण्याससाठी 23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2022 पर्यंत कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर्स आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद असतील असे कंपनीच्या संचालक मंडळाने जाहीर केले आहे. कंपनीने फायनल डिव्हिडेंडसाठी 22 सप्टेंबर 2022 ही तारीख निश्चित केली आहे. फायनल डिव्हिडेंड मंजूर झाल्यास, डिव्हिडेंड एजीएमच्या तारखेपासून 30 महिन्यांच्या आत ट्रान्सफर केला जाईल.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.