Russia vs Ukraine : रशियाची माघार! खारकीव्ह शहरावर पुन्हा युक्रेनचा ताबा

Home » Russia vs Ukraine : रशियाची माघार! खारकीव्ह शहरावर पुन्हा युक्रेनचा ताबा
Russia vs Ukraine : रशियाची माघार! खारकीव्ह शहरावर पुन्हा युक्रेनचा ताबा

Russia vs Ukraine : रशिया युक्रेन युद्धाला जवळपास सहा महिने उलटून गेले तरी कुणीच माघार घ्यायला तयार नाही.. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत असून प्रतिहल्ल्यामुळे युक्रेनमधील दुसरे महत्त्वाचे शहर असलेल्या खारकीव्हमधून रशियाला सैन्य माघारी घेण्याची वेळ आली आहे. युक्रेनच्या जोरदार प्रतिहल्ल्यामुळे रशियाचे सैन्य टिकाव धरू शकले नसल्याने रशियाला युक्रेनकडून मोठा धक्का बसला आहे. (Russia Ukraine Crisis Latest Updates)दरम्यान, गेल्या आठवड्यापासून युक्रेन सैन्यांची अत्यंत जलद आगेकूच सुरू असून युद्धाची चित्रे पालटण्याची शक्यता आहे. युक्रेनी सैन्यांनी प्रतिकार करताना खारकीवचे तळ आणि मार्ग पुन्हा ताब्यात घेतल्याने कोंडी होऊ नये यासाठी रशियाने आपले सैन्य मागे घेतले आहे. हे युक्रेनच्या सैन्यांचं सर्वांत मोठं यश मानलं जात असून पुतीन यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ4 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या7 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप10 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 14 minutes agoहेही वाचा: Laser Show: गणेशोत्सवातील लेझर शो घातक; कोल्हापुरात 63 जणांच्या डोळ्याला इजाफेब्रुवारीमध्ये हल्ला केल्यानंतर काही दिवसांतच युक्रेनचा ताबा हातात येण्याची अपेक्षा असलेल्या रशियाला युक्रेनी सैनिकांच्या चिवट प्रतिकारामुळे आणि उर्वरित जगाने टाकलेल्या निर्बंधांमुळे मर्यादित यश मिळाले आहे. युद्धाला सहा महिने उलटून गेल्यानंतरही रशियाला युक्रेनचा पूर्वेकडील भाग आणि दक्षिणेकडील काही भाग ताब्यात घेता आला आहे. मात्र, युक्रेनी सैनिकांनी ऑगस्टच्या अखेरपासून सुरु केलेल्या प्रतिहल्ल्यांमुळे हा ताब्यात आलेला भागही आता रशियाच्या हातून निसटून चालला असल्याचे चित्र आहे. युक्रेनी सैनिकांनी केलेल्या जोरदार हल्ल्यामुळे रशियावर खारकिव्ह या मोठ्या शहरातून सैन्यमाघारी जाहीर करण्याची नामुष्की ओढविली आहे.