Share Market : लवकरच येतोय मॅनकाईंड फार्माचा IPO, अधिक जाणून घेऊयात..

Home » Share Market : लवकरच येतोय मॅनकाईंड फार्माचा IPO, अधिक जाणून घेऊयात..
Share Market : लवकरच येतोय मॅनकाईंड फार्माचा IPO, अधिक जाणून घेऊयात..

मॅनफोर्स कंडोम आणि प्रेग्नेंसी किट प्रेगा न्यूज विकणारी कंपनी मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे सुत्रांकडून समजते आहे. मॅनकाइंड फार्माने (Mankind Pharma) बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट प्रॉस्पेक्स्ट्स दाखल केला आहे. प्रायव्हेट इक्विटी फर्म क्रिसकॅपिटलची (ChrysCapital) यात गुंतवणूक आहे. कंपनीचा आयपीओ 5587 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो असे सुत्रांकडून समजतंय. जर मॅनकाइंडचा आयपीओ या आकारात आला तर तो फार्मा क्षेत्रातला दुसरा सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो. या क्षेत्रातील सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम ग्रँड फार्माच्या नावे (Gland Pharma) आहे, त्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये 6927 कोटीचा आयपीओ आणला होता.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव5 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 6 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.13 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ31 minutes agoहेही वाचा: Tourism : ऑक्टोबरमधील सणांचा आनंद घ्यायचा असेल तर ‘या’ खास ठिकाणी भेट द्या..कंपनीने ड्राफ्ट फाईल दाखल केल्याचे सुत्रांकडून समजतंय. त्यांच्याकडे रोख जास्त आहे आणि त्यामुळे कंपनी चांगल्या मार्जिनसाठी ओटीसी उत्पादनांमध्ये विस्तार करण्याचा विचार करत आहे. आयपीओ ऑफर फॉर सेल असू शकतो. इतर फार्मा कंपन्यांच्या तुलनेत मॅनकाइंड फार्माचा भारतात सर्वाधिक व्यवसाय आहे, ज्यामुळे ती गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकते.मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स, ओटीसी प्रॉडक्ट्स आणि पशुवैद्यकीय औषधे तयार करते. त्याच्या टॉप ब्रँड्समध्ये प्रेगा न्यूज, मॅनफोर्स, अनवॉन्टेड-21, एक्नेस्टार, रिंगआउट, गॅस-ओ-फास्टचा समावेश आहे. कंपनीत 14 हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात आणि तिचा व्यवसाय अमेरिका, श्रीलंका, कंबोडिया, केनिया, कॅमरून, म्यानमार आणि फिलीपिन्ससह 34 देशांमध्ये आहे.हेही वाचा: Health : वारंवार शरीरातील अवयवांना सूज येत असेल तर ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा2021 च्या आर्थिक वर्षात कंपनीने 6385 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीला 1293 कोटी रुपयांचा निव्वळ नफामिळाला होता. कंपनीचे पोंटा साहिब (हिमाचल प्रदेश), सिक्कीम, विझाग आणि राजस्थानसह 21 ठिकाणी प्लांट्स आहेत.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.