फक्त 11 हजारांची गुंतवणूक आणि बँकिंग स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले कोट्यधीश.

फक्त 11 हजारांची गुंतवणूक आणि बँकिंग स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले कोट्यधीश.

खाजगी क्षेत्रातील दिग्गज कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सने (Kotak Mahindra Bank) त्यांच्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा दिला आहे. सध्या हा शेअर घसरणीवर ट्रेंड होतो आहे. आता हा शेअर डिस्काउंटवर मिळत असल्याने तज्ज्ञांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पण याआधी फक्त 11,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर त्याने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले. कोटक बँकेचे शेअर्स सध्या बीएसईवर 1,823.50 रुपयांवर आहेत.

गेल्या एका वर्षात हा शेअर 6 टक्क्यांपेक्षा खाली घसरला आहे. येत्या काळात तेजीचे संकेत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. त्यात देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने यामध्ये गुंतवणुकीसाठी 2168 रुपयांचे टारगेट दिले आहे, जी सध्याच्या किंमतीपेक्षा 19 टक्के जास्त आहे.

कोटक बँकेचे शेअर्स 25 वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर 1997 ला 2 रुपयांना होते. आता त्याची किंमत 1823.50 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने त्यावेळी कोटक बँकेत फक्त 11 हजार रुपये गुंतवले असते तर तो आतापर्यंत 912 पटीने वाढून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते.

कोटक बँकेचे शेअर्स मागच्या वर्षी 27 ऑक्टोबर 2021 ला 2,252.45 रुपयांवर होते, जो एका वर्षातील उच्चांक आहे. सध्या त्याच्या किमती 24 टक्क्यांपेक्षा डिस्काऊंटवर मिळत आहेत. त्यामुळे या शेअर्समध्ये आता गुंतवणुकीची चांगली संधी असल्याने ही वेळ दवडू नका असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा