Afghanistan : काबुलमधील शाळेवर मोठा दहशतवादी हल्ला; 24 विद्यार्थी ठार

Afghanistan : काबुलमधील शाळेवर मोठा दहशतवादी हल्ला; 24 विद्यार्थी ठार

काबूल : अफगाणिस्तानमधील (Afghanistan) एका शाळेवर भीषण दहशतवादी हल्ला (Terrorist attack) झाल्याचं वृत्त आहे. यामध्ये 24 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून यात बहुतांश शालेय विद्यार्थ्यांचा (School Students) समावेश आहे. दहशतवाद्यांनी स्फोट घडवून हा हल्ला केला. या घटनेत आतापर्यंत 35 जण जखमी झाले आहेत.

काबूलच्या पश्चिमेकडील दश्ते बरची येथील एका शैक्षणिक संस्थेवर हा हल्ला झाला. इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांतानं हा हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये बहुतांश हजारा आणि शिया समुदायाच्या लोकांना लक्ष्य करण्यात आलं होतं. याआधी एप्रिलमध्ये काबूलमधील दोन शैक्षणिक संस्थांमध्ये स्फोट झाले होते, त्यात सहा जण ठार आणि अनेक जण जखमी झाले होते.

या दोन्ही शाळा काबूलच्या दश्ते बरची भागात आहेत. अफगाणिस्तानचे पत्रकार बिलाल सरवारी यांनी आपल्या ट्विटमध्ये या हल्ल्याची माहिती दिली आहे. वतन रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णालयात अनेक मृतदेह असल्याची पुष्टी केलीय. सरवरी म्हणाले, ‘परिसरातील एका समुदायाच्या नेत्यानं मला सांगितलं की मी आतापर्यंत 24 मृतदेहांची मोजणी केली आहे. त्यापैकी बहुतांश मृत तरुण विद्यार्थी होते.’