Box Office: ‘पोन्नियन सेल्वन’ची करोडोंच्या फरकानं विक्रम वेधावर मात; कोणाची कमाई किती? वाचा

Box Office: ‘पोन्नियन सेल्वन’ची करोडोंच्या फरकानं विक्रम वेधावर मात; कोणाची कमाई किती? वाचा

BoXOffice Collection: प्रत्येक शुक्रवारी बॉक्सऑफिसवर एखादा तरी नवीन सिनेमा रिलीज होतोच. आता तर एकाचवेळी २ ते ३ सिनेमांची बॉक्सऑफिसवर टक्कर झालेली पहायला मिळते. या वेळी ‘विक्रम वेधा’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन १’ शुक्रवारी,30 सप्टेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या ‘विक्रम वेधा’ची हिंदी प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. दुसरीकडे,’पोन्नियिन सेल्वन १’ चे दक्षिणेत अधिक वर्चस्व असल्याचे दिसून आले. आता दोघांचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले असून, कळतंय की ‘पोन्नियिन सेल्वन’ने ‘विक्रम वेधा’ला मात दिली आहे.(Ponniyin Selvan And Vikram Vedha Boxoffice Collection on first day)

चियान विक्रम, ऐश्वर्या राय आणि कार्ती यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या ‘पोनियिन सेल्वन -१’ या चित्रपटाला दक्षिणेत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दक्षिण भारतात चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली आहे.हिंदी आवृत्तीत या चित्रपटाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद फारसा मिळाला नाहीय. मात्र, पहिल्या दिवशी पोन्नियिन सेल्वनचे कलेक्शन ४० कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास ५०० कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाने बजेटनुसार ८ टक्के कमाई केली आहे.

त्याचबरोबर हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट लोकांमध्ये गाजत असला, तरी हा चित्रपट साऊथचा रिमेक असल्यामुळे बॉयकॉट ट्रेन्डचा बळी ठरला आहे असं पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवरुन वाटत आहे. चित्रपटाचे फारसे प्रमोशनही झाले नाही,त्याचा परिणाम बॉक्सऑफिस कलेक्शनवर झाल्याचं देखील बोललं जात आहे . या कारणास्तव, ‘विक्रम वेधा’चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन केवळ ११.५० कोटी रुपयांच्या जवळपास होते. ‘विक्रम वेधा’ चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन या वर्षीच रिलीज झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘बच्चन पांडे’ या बड्या स्टार्सच्या फ्लॉप चित्रपटांपेक्षाही कमी आहे. पण बघितले तर विक्रम वेधाने आपल्या बजेटपैकी ६.६७ कोटी कमावले आहेत.

दोन्ही चित्रपटांच्या बजेटनुसार त्यांचे सरासरी कलेक्शन पाहिल्यास ‘पोन्नियिन सेल्वन’ने या बाबतीत हृतिक रोशनच्या ‘विक्रम वेधा’ला मागे टाकले आहे. ‘विक्रम वेधा’ची तिकिटे मोठ्या प्रमाणात विकली गेली असतील, पण साऊथच्या मल्टिस्टारर चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन-१’मुळे या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर मात्र दमछाक होताना दिसून येतेय.