SBI: मल्टीबॅगर एसबीआयच्या शेअर्समध्ये आणखी होणार तेजी

SBI: मल्टीबॅगर एसबीआयच्या शेअर्समध्ये आणखी होणार तेजी

देशातील सर्वात मोठी पीएसयू बँक एसबीआयने लोकांचा बँकिंगबाबतचा विश्वास तर वाढवलाच पण गुंतवणूकदारांसाठी अतिशय विश्वासाचा स्टॉक म्हणूनही नावाला आला. एसबीआयने 30 वर्षांपेक्षा कमी काळात गुंतवणूकदारांची संपत्ती 29 पटीने वाढवली.

एसबीआयच्या शेअर्सने यावर्षी आतापर्यंत 12 टक्क्यांहून अधिक वाढ नोंद केली आहे आणि अजूनही तेजीचा कल आहे. बाजार तज्ज्ञांनी यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी 680 रुपयांचे टारगेट दिले आहे, जी सध्याच्या किंमतीपेक्षा 28 टक्के अधिक आहे. त्याचे शेअर्स बीएसईवर 531.05 रुपयांवर बंद झाले आहेत.

14 जुलै 1995 ला एसबीआयच्या शेअर्सची किंमत अवघी 18.59 रुपये होती. पण आज तीच किंमत 531.05 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच 30 वर्षांपेक्षा कमी काळात एसबीआयने गुंतणूकदारांच्या पैशात सुमारे 29 पटीने वाढ केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी 15 सप्टेंबरला एसबीआय शेअर्सने 578.65 रुपयांची विक्रमी किंमत गाठली. पण, त्यानंतर प्रॉफिट बुकींगमुळे त्याची किंमत 531.05 रुपयांपर्यंत घसरली आहे.

ट्रेंड काय ?
भारतीय बँकिंग व्यवस्थेतील मजबूत स्थिती पाहता, इतर पीएसयू बँकांच्या तुलनेत कोणत्याही अनिश्चिततेला सामोरे जाण्यासाठी एसबीआय चांगल्या स्थितीत असल्याचे ब्रोकरेज फर्म केआर चोक्सीच्या विश्लेषकांचे म्हणणे आहे. तिचा नफा 29 टक्के CAGR आणि आर्थिक वर्ष 2022-24 मध्ये 13 टक्के CAGR वर वाढू शकतो.

FY2024 पर्यंत त्याचा आरओए 0.9 टक्के आणि आरओई 15.1 टक्क्यांपर्यंत सुधारेल अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या सर्व कारणांमुळे, केआर चोक्सीने याला बाय रेटिंग दिले आहे आणि टारगेट 617 रुपयांवरून 680 रुपये केली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.