‘NPS’ मधील महत्त्वाचे बदल‘एनपीएस’मधील महत्त्वाचे बदल

Home » ‘NPS’ मधील महत्त्वाचे बदल‘एनपीएस’मधील महत्त्वाचे बदल
‘NPS’ मधील महत्त्वाचे बदल‘एनपीएस’मधील महत्त्वाचे बदल

केंद्र सरकारने वर्ष २००४ पासून सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती नियोजन करता यावे म्हणून ‘एनपीएस’ अर्थात ‘नॅशनल पेन्शन सिस्टीम’ दाखल केली व पाच वर्षानंतर ती सर्वांसाठी खुली केली. मे २०२२ पर्यंत ५.३१ कोटी लोकांनी या योजनेअंतर्गत आपले खाते उघडले असून ७.३८ लाख कोटी रुपये गुंतवले आहेत. अलिकडेच या योजनेची नियामक संस्था ‘पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’ (पीएफआरडीए) आणि विमा क्षेत्राची नियामक संस्था ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅंड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ (आयआरडीएआय) यांनी या योजनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत:ई-नॉमिनेशनच्या प्रक्रिया गतीमानई-नॉमिनेशनच्या प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये ‘पीएफआरडीए’ने ऑनलाइन नामांकन करण्याची सुविधा सभासदांना उपलब्ध करून दिली. नोडल ऑफिसकडे अर्ज दिल्यावर त्यांनी तो मंजूर करून ‘सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी’ (सीआरए)कडे पाठविणे अपेक्षित आहे, परंतु ‘पीएफआरडीए’च्या असे लक्षात आले, की या प्रक्रियेला खूप वेळ लागत आहे. म्हणून त्यांनी आता असा नियम केला आहे, की नामांकनाचा अर्ज नोडल ऑफिसने ३० दिवसात मंजूर अथवा नामंजूर करावा व तसा निर्णय त्यांनी ३० दिवसांत न घेतल्यास तो मंजूर झाला आहे, असे मानून ‘सीआरए’ नामांकन नोंदवेल. सध्या विलंबित असणाऱ्या अर्जांनासुद्धा हा नवा नियम १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होईल. या बदलामुळे नामांकनाची प्रक्रिया लवकर पार पडेल अशी अपेक्षा आहे.Recommended Articlesशिरोळला १०० टक्के लसीकरणशिरोळला १०० टक्के लसीकरणडी आर पाटील ः सकाळ वृत्तसेवाशिरोळ, ता. २५ ः तालुक्यातील गाय, बैल व वासरे यांना लंपी आजाराबाबत लसीकरण करण्याची मोहीम शंभर टक्के पूर्ण झाली आहे. राज्यामध्ये लसीकरण पुर्ण करणारा शिरोळ तालुका पहिला ठरला आहे.शिरोळ तालुक्यामध्ये सुमारे एक लाख पशुधन आहे. यामध्ये सुमारे ६6 hours agoBollywood: अजय देवगणला का झालेय दु:ख ?Bollywood चा सिंघम अजय देवगण हा त्याच्या दमदार अभिनयाने सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवतोय.सध्या तो ‘थँक गॉड’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमूळे तो वादातही अडकला आहे. तो सध्या खूप दु:खी आहे. त्याच कारणही तसंच आहे.आज त्याचा पाळीव कुत्रा कोको गमावल्याबद्दल शोक व्यक्त केला. त्याने त्याच्या सो6 hours agoPune : बारामतीच्या कविवर्य मोरोपंत स्पर्धेत पराग बदिरके ठरला विजेताबारामती : यंदाच्या कविवर्य मोरोपंत वक्तृत्व स्पर्धेचे विजेतेपद¬¬ पराग राजेंद्र बदिरके (यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे) याने पटकावले. रोहन ज्योतीराम कवडे व तेजस दिनकर पाटील यांच्या संघाने (अप्पासाहेब जेधे महाविद्यालय, पुणे) हा वादविवाद स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. 6 hours agoHealth: सावध! सतत घामाचा वास येत असेल तर असू शकतो गंभीर आजार, कसं ओळखायचं?Health Tips: अति धावपळ झाल्यास किंवा गर्दीसारख्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीस घाम येणे साहाजिक आहे. मात्र अनेकदा अनेकांना त्यांच्या घामाचा वास येत असल्याचे जाणवते. असे तुमच्याही सोबत होत असल्यास तुम्हालाही लगेच सावध होण्याची गरज आहे. कारण तुमच्या घामाचा वास येत असल्यास तुम्हाला असू शकतात काह6 hours agoॲन्यूइटीसाठी आता एकच अर्जॲन्यूइटी मिळविण्याच्या प्रक्रियेतही आता बदल करण्यात आला आहे. पूर्वी मुदतपूर्तीच्या वेळी ‘पीएफआरडीए’कडे दोन अर्ज करावे लागायचे. एक ‘एनपीएस’ खाते बंद करण्यासाठी व दुसरा विमा कंपनीकडे ॲन्यूइटी सुरू करण्याबाबत. आता ‘एनपीएस’ खाते बंद करण्याच्या अर्जालाच ॲन्यूइटी खरेदीचा अर्ज मानण्यात येणार आहे. त्यासाठी विमा कंपनीकडे वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.आधार कार्डावर आधारित डिजिटल हयातीचा दाखला मान्यआता डिजिटल लाइफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीच्या दाखल्याला मान्यता देण्यात आली आहे. ॲन्यूइटीची रक्कम मिळविण्याकरता वर्षातून एकदा ‘लाईफ सर्टिफिकेट’ म्हणजेच हयातीचा दाखला विमा कंपनीला द्यावा लागतो. ‘आयआरडीएआय’ने विमा कंपन्यांना सांगितले आहे, की आधार कार्डावर आधारित डिजिटल हयातीचा दाखला म्हणजे ‘जीवन प्रमाणपत्र’ मान्य करावे.क्रेडिट कार्डाद्वारे पैसे भरण्यास मनाई‘एनपीएस’च्या दुसऱ्या खात्यावर ऑगस्ट २०२२ पासून क्रेडिट कार्डाद्वारे पैसे भरता येणार नाहीत. एनपीएस-१ खात्यावर सध्या तरी अशा प्रकारे पैसे भरता येतात.‘एनपीएस’ खातेधारकांनी आणि पेन्शनरनी वरील महत्त्वाचे बदल समजून घेणे हिताचे ठरेल.(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)