King Charles : किंग चार्ल्स लंडनमध्ये पोहोचले; शनिवारी होणार सम्राटपदी विराजमान

Home » King Charles : किंग चार्ल्स लंडनमध्ये पोहोचले; शनिवारी होणार सम्राटपदी विराजमान
King Charles : किंग चार्ल्स लंडनमध्ये पोहोचले; शनिवारी होणार सम्राटपदी विराजमान

लंडन : ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे नवे सम्राट होणार आहेत. दरम्यान, प्रिन्स चार्ल्स हे लंडनमध्ये दाखल झाले असून शनिवारी त्यांची अधिकृतरित्या महाराजा म्हणून नियुक्ती होणार आहे. त्याचबरोबर पत्नी कॅमिला यांच्या डोक्यावरही कोहिनूर हिरा जडलेल्या मुकूट परिधान केला जाणार आहे. (King Charles will be officially proclaimed as Britain new monarch on Saturday 10th September)शनिवारी १० सप्टेंबर रोजी सेंट जेम्स पॅलेस येथे अॅक्सेसेशन कौन्सिलच्या बैठकीत किंग चार्ल्स यांची अधिकृतपणे ब्रिटनचे नवीन सम्राट म्हणून घोषणा केली जाईल. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनामुळं संपूर्ण ब्रिटन सध्या शोक सागरात बुडाला आहे. ब्रिटनमध्ये आजपासून १० दिवसांसाठी राजकीय शोक पाळला जाणार आहे. त्याचबरोबर भारतानं देखील ११ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ3 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या6 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप9 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 13 minutes agoहेही वाचा: ब्रिटनच्या महाराणीला मरणोत्तर 96 तोफांची सलामी; पाहा Videoदरम्यान, लंडनमध्ये पोहोचल्यानंतर किंग चार्ल्स पहिल्यांदा ब्रिटनच्या जनतेला संबोधित करणार आहेत. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर त्याचं भाषण आधारित असेल. ब्रिटनच्या इतिहासात सर्वाधिक काळ महाराणीपद भूषणवलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांना नागरिकांनी त्यांच्या बाल्मोरल पॅलेसबाहेर फुलांचे गुच्छ ठेवत श्रद्धांजली अर्पण केली.