ब्रिटनच्या महाराणीला मरणोत्तर 96 तोफांची सलामी; पाहा Video

Home » ब्रिटनच्या महाराणीला मरणोत्तर 96 तोफांची सलामी; पाहा Video
ब्रिटनच्या महाराणीला मरणोत्तर 96 तोफांची सलामी; पाहा Video

लंडन : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं काल बकिंगहॅम पॅलेस इथं वृद्धापकाळानं निधनं झालं, त्या ९६ वर्षांच्या होत्या. यापार्श्वभूमीवर ब्रिटनच्या लष्कराकडून त्यांना आज (शुक्रवार) त्यांच्या वया इतक्या अर्थात ९६ तोफांची सलामी देण्यात आली. याचा व्हिडिओ समोर आला आहे. (Posthumous 96 gun salute to Queen of Britain Elizabeth II Watch Video)लंडनमधील बेलफास्ट इथल्या कार्डीफ आणि एडिम्बर्ग इथं महाराणीला ही सलामी देण्यात आली. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लंडनमध्ये गन सॅल्युट अर्थात तोफांची सलामी देण्यात आली. प्रत्येक १० सेकंदानंतर एक अशा ९६ तोफांची म्हणजेच राणीच्या प्रत्येक जन्मवर्षाची यावेळी सलामी देण्यात आली. Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ3 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या6 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप9 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 13 minutes agoहेही वाचा: “CM साहेब, किती वेळा भीक मागायची”; तुतारी वादकाचा ऑन कॅमेरा आत्महत्येचा प्रयत्नही तोफांची सलामी एकाच ठिकाणी न देता विविध ठिकाणांहून देण्यात आली. यामध्ये कार्डिफ कॅसल, एडिम्बर्ग कॅसल, हिलबोर कॅसल, यॉर्क तसेच पोर्ट्समाऊथ आणि गिब्राल्टर या ठिकाणांचा समावेश आहे. ब्रिटनच्या लष्कराच्या विविध तुकड्यांनी ही तोफांची सलामी दिली. अशा प्रकारे तोफांची सलामी ही जमीनीवरुन तसेच समुद्रावरुन दिली जात होती. आता राजघराण्याशी संबंधीत वर्षातील काही दिवशी देखील अशा प्रकारे तोफांची सलामी दिली जाते. हेही वाचा: “माझ्यामुळं इतर लोकांना पुण्य मिळतंय”; एकनाथ शिंदेंचा खोचक टोलाराजेशाही वर्धापनदिनांमध्ये बंदुकीची सलामी दिली जाते ज्यामध्ये प्रवेश दिवस, राणीचा वाढदिवस, राज्याभिषेक दिन, राणीचा अधिकृत वाढदिवस, संसदेचं उद्घाटन, राजेशाही जन्म तसेच जेव्हा लंडन, विंडसर किंवा एडिनबर्ग इथं राष्ट्राध्यक्ष राणीला भेटतात, त्यावेळी अशा प्रकारे तोफांची सलामी दिली जाते.