Health : लठ्ठपणा कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारा

Health : लठ्ठपणा कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारा

फास्ट फुड, पॅकबंद पदार्थ, आरामदायी जीवनशैली, मैदानी खेळांचा अभाव, स्मार्टफोनचा अतिवापर यामुळे मुलांमधे लठ्ठपणा वाढून कोलेस्ट्रोल व रक्तदाबाची समस्या निर्माण होत आहे. मुलांमध्ये उच्च कोलेस्टेरॉलची समस्या वाढत आहे.ते हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या आजारांचे मुख्य कारण आहे. कोलेस्टेरॉल हा रक्तात आढळणारा एक प्रकारचा चरबी किंवा चरबीसारखा पदार्थ (लिपिड) आहे. रक्तातील या अनियमित पातळीला डिस्लिपिडेमिया म्हणतात. दोरीवर उड्या मारणे ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे.

धमऩ्यात प्लाक जमा होणे धोक्याचे
अनियंत्रित कोलेस्टेरॉल आणि चरबीमुळे आपल्या धमन्यांत प्लाक जमा होणे म्हणजे डिस्लिपिडेमिया. त्यामुळे धमन्या जाड होतात आणि रक्तप्रवाहावर परिणाम होतो. यामुळे व्यक्तीला हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. ब्रदर्स यांच्या म्हणण्यानुसार, उच्च कोलेस्टेरॉलचा वेळीच समतोल राखला नाही तर वयाच्या २० व्या वर्षीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

उच्च कोलेस्टेरॉलची कारणे?
मुलांमध्ये कोलेस्टेरॉल वाढण्याची मुख्यतः दोन कारणे आहेत. पहिले आनुवंशिक आणि दुसरे जीवनशैली.​​​​​​​ जीन्समधील उत्परिवर्तनांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी असंतुलित होते. याला फॅमिलियल हायपरकोलेस्टेरोलेमिया म्हणतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांमध्ये लहान वयातच कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. चांगले कोलेस्टेरॉल रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल काढून टाकते. अशा परिस्थितीत त्यांच्यातील कोलेस्टेरॉलची समस्याही त्याच प्रमाणात वाढली आहे.

खेळणे गरजेचे
मुलांना दररोज किमान एक तास अवश्य खेळू द्यावे.खेळ, व्यायामामुळे रक्तातील एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते. एचडीएल शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल काढून टाकते. मुलांना दोरीवर उड्या मारायला लावावे. १० मिनिटे वेगाने दोरीवरील उड्या मारण्यात ३० मिनिटे जॉगिंगइतकीच ऊर्जा खर्च होते.

आहाराला द्यावे लक्ष
फळे, भाज्या, शेंगदाणे यांचा समावेश करा. फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, फायबर, खनिजे आणि पाणी असते. साखर, सोडियम व चरबीचे प्रमाण खूपच कमी आढळते. हे पोषण कोलेस्टेरॉल नियंत्रित करते. त्याच वेळी शेंगदाण्यांत प्रोटीनसह उच्च कोलेस्टेरॉल नियंत्रित करणारी चरबीही आढळते.