Queen Elizabeth: राणी एलिझाबेथ द्वितीय आपला वाढदिवस वर्षातून दोनदा साजरा करायच्या…

Home » Queen Elizabeth: राणी एलिझाबेथ द्वितीय आपला वाढदिवस वर्षातून दोनदा साजरा करायच्या…
Queen Elizabeth: राणी एलिझाबेथ द्वितीय आपला वाढदिवस वर्षातून दोनदा साजरा करायच्या…

ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर तब्बल सात दशके एलिझाबेथ द्वितीय विराजमान होत्या. राणी एलिझाबेथ यांचा जन्म लंडनमध्ये 21 एप्रिल 1926 रोजी झाला होता. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा राज्याभिषेकाला 2022 मध्ये 69 वर्ष पूर्ण झाली. महाराणी 2 जून 1953 रोजी ब्रिटनच्या राजगादीवर विराजमान झाल्या होत्या. राज्याभिषेक झाल्यानंतर त्या ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह कॉमनवेल्थ देशांवरही त्यांचं वर्चस्व होतं. यासोबतच खास गोष्ट म्हणजे, तेव्हापासून त्यांना दोन वाढदिवस साजरे करण्याची परवानगी मिळाली.याचं कारणही ब्रिटनच्या इतिहासात देण्यात आले आहे. त्यांचा खरा वाढदिवस 21 एप्रिल रोजी होता. पण राज्याभिषेकनंतरचा दुसरा वाढदिवस हा अधिकृत वाढदिवस असल्यानं त्या दिवसाला विशेष महत्व होतं. 17 जूनला हा वाढदिवस साजरा केला जात होता. या दिवशी वाढदिवसाला वार्षिक परेडचं आयोजन केलं जात होतं. या दिवशी संपूर्ण ब्रिटनमधून लोक येत असतात. एप्रिल 2022 मध्येच त्यांनी त्यांचा 96 वा वाढदिवस साजरा केला होता.राणीच्या दुसऱ्या वाढदिवसाचा संबंध ब्रिटनच्या हवामानाशी सुद्धा होता. ब्रिटनमध्ये, सिंहासनावर बसणारा राजा किंवा राणी जून महिन्यात आपला वाढदिवस साजरा करतात कारण त्यावेळी ब्रिटनमधील हवामान चांगलं असतं.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ3 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या6 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप9 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 13 minutes agoआणि अशा प्रकारे अधिकृत वाढदिवसाची सुरुवात झाली..किंग जॉर्ज यांनी 1748 मध्ये घोषणा केली होती की, राजघराण्यातील कोणत्याही राजपुत्राच्या किंवा सिंहासन धारण करणार्‍या व्यक्तीच्या वाढदिवस मोठा उत्सव म्हणून साजरा करण्यात येईल. यादिवशी शाही परेडचं आयोजन करण्यात येईल.पण पुढे गादीवर बसलेल्या एडवर्डचा वाढदिवस नोव्हेंबर महिन्यात आला. पण त्या महिन्यात ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फ पडतो, थंडीचे वातावरण असते. त्यांचं राज्यरोहण 17 जून रोजी झालं होतं. त्यामुळे त्यांनी आपला वाढदिवस 17 जूनला साजरा करण्याचं ठरवलं. या काळात ब्रिटनमधील हवामान हलकं आणि उष्ण असतं. अशाप्रकारे,17 जून रोजी ही तारीख अधिकृत वाढदिवस साजरा करण्यासाठी ठरवण्यात आली.भव्य असा अधिकृत वाढदिवसब्रिटनच्या राजा किंवा राणीसाठी अधिकृत वाढदिवस खूप खास असतो. कारण तो अतिशय भव्य पद्धतीने साजरा केला जातो. यावेळी 14 मोठे अधिकारी, सुमारे 200 घोडे आणि सैनिकांचा सहभाग आहे. याशिवाय 400 संगीतकार एकत्र येतात आणि संगीताच्या माध्यमातून हा दिवस संस्मरणीय बनवतात. शाही परेड राणीच्या निवासस्थानाबाहेर बकिंगहॅम पॅलेस येथे सुरू होते आणि शहरातून परत जाते. त्याला ‘ट्रूपिंग द कलर’ असे म्हणतात.