Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका

Home » Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका
Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका

आळसंद : जनावरांसाठी जीवघेणा ठरत असलेल्या ‘लम्पी’ स्कीनच्या साथीकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. पाळीव प्राण्यांच्या आरोग्या संदर्भात उद्‌भवलेली ही अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन माजी खासदार राजू शेट्टी, संपतराव पवार, भालेगावचे सरपंच तेजस पाटील व अहमदनगरचे सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख यांनी अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. तृणाल टोणपे, अ‍ॅड. अजित देशपांडे, अ‍ॅड. अजिंक्य उडाणे, अ‍ॅड. अक्षय देसाई यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याची माहिती अॅड. संदेश पवार यांनी दिली.महाराष्ट्रात ‘लम्पी’आजाराची संक्रमकता अतिशय वेगवान असून या रोगामुळे गायी, म्हशी आणि दुभती जनावरे मरत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सरकारकडून बेजाबदार पद्धतीने केवळ घोषणा केल्या जात आहेत. पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचीही संख्याही कमी आहे. त्यामुळे गावागावांमध्ये लम्पी विषाणूने बाधित होणाऱ्या जनावरांना एकाच वेळी वैद्यकीय सेवा देण्यासाठी पशुवैद्यक अपुरे पडणार आहेत, असे निरीक्षण याचिकेतून मांडले आहे. याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. असीम सरोदे म्हणाले, ‘पशु वैद्यकीय कायद्यातील तरतुदींना शिथिल करून पशुवैद्यकीय शास्त्रात प्रमाणपत्र व पदविका असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची सेवा देण्यासाठी मुभा देता येऊ शकते. सरकारने या साथीच्या रोगाच्या प्रश्नावर तत्काळ राबविण्याच्या उपाययोजना व दूरदर्शी उपाय यांचे नियोजन करण्याची गरज आहे. पशु हक्कांचे संरक्षण करणे हे भारतीय संविधांचे मूल्य आहे म्हणून आम्ही ही याचिका दाखल करतो आहोत.’Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर20 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त21 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.21 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम27 minutes ago‘केवळ पैसे किंवा भरपाई योजना जाहीर करणे हे याचे उत्तर नाही. प्राण्यांच्या दृष्‍टिकोनातून आरोग्य आणीबाणीची परिस्थिती आहे. सरकारने यंत्रणेला नियोजनबद्ध पद्धतीने कामाला लावणे गरजेचे आहे. आजारग्रस्त गायींचे लसीकरण कसे करणार, पाळीव प्राण्यांना ‘लम्पी’पासून वाचविण्यासाठी काय उपाययोजना आहेत? लसीकरण सार्वत्रिक कसे करणार याबाबत सरकारचे स्पष्ट धोरणच नाही.
– राजू शेट्टी, माजी खासदार
‘अस्मानी संकटात लोकसहभाग मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. पशुधन हा एकमेव आधार असलेले शेतकरी अशा रोगांची साथ किंवा चाराटंचाई यासारख्या नैसर्गिक अरिष्टात वारंवार अडकत असतात. यावर कायमस्वरूपी योजनेसंदर्भात शासनाने धोरण ठरवावे.
– संपतराव पवार, सामाजिक कार्यकर्ते, बलवडी (भा.‌)

‘साथीबाबत सोशल मीडियावरून निरनिराळ्या औषधांचा प्रसार सुरू आहे. याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून साथीबाबत शास्त्रीय माहितीचे प्रसारण प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. या विषाणूंचा उद्रेक होण्याआधी या साथीबाबत आदर्श कामकाज पद्धती अमलात आणावी.
– अॅड. संदेश पवारजनहित याचिकेत उपस्थित केलेले प्रश्न
‘संरक्षित विभाग’ म्हणून जाहीर केलेल्या विभागांमध्ये नेमकी कोणती यंत्रणा उभारली जाईल? पशुवैद्यकीय तज्ज्ञांसाठी आदर्श कार्यप्रणाली ‘फूड अँड अग्रीकल्चर ऑर्गनायझेशन’ या संयुक्त राष्ट्र संघाच्या संस्थेद्वारे प्रकाशित अहवालावर आधारित करण्यात येईल का?

याचिकेत केलेल्या मागण्या
पशुवैद्यकीय शास्त्रात बीव्हीएस्सी झालेल्या डॉक्टरांसोबतच प्रमाणपत्र आणि डिप्लोमा घेतलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना ‘लम्पी आजार योद्धे’ म्हणून अधिकार, सुविधा आणि संरक्षण देण्यात यावे. ‘लम्पी’ आजाराने मृत झालेल्या प्रत्येक गायी-गुरांसाठी दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. राज्यातील गायी-गुरे असलेल्या शेतकऱ्यांना पाळीव प्राण्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सगळ्या ग्रामपंचायती, नगरपरिषद, महानगरपालिकांनी करावी.