Rupee Bank : उद्यापासून ‘या’ बँकेला लागणार टाळं; आजच पैसे घ्या काढून

Home » Rupee Bank : उद्यापासून ‘या’ बँकेला लागणार टाळं; आजच पैसे घ्या काढून
Rupee Bank : उद्यापासून ‘या’ बँकेला लागणार टाळं; आजच पैसे घ्या काढून

देशातील आणखी एका को-ऑपरेटिव्ह बँकेला उद्या टाळं लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पुण्यातील रुपी सहकारी बँक बंद करण्याचे आदेश दिलेत. उद्यापासून या बँकेच्या सर्व सेवा बंद होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी त्यांचे पैसे बँकेतून काढावेत, अशी सूचना आरबीआयने दिली आहे. 22 सप्टेंबरनंतर ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत असंही आरबीआयने स्पष्ट केलं आहे. आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे रुपी सहकारी बँक बंद होत आहे. आरबीआयने पुणेस्थित रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला. बँक उद्यापासून (22 सप्टेंबर) आपले सर्व व्यवहार बंद करत आहे. त्यामुळे पैसे काढण्यासाठी बँकेच्या ग्राहकांकडे केवळ आजचा दिवस शिल्लक आहे. यानंतर ग्राहकांना त्यांचे पैसे खात्यातून काढता येणार नाहीत. रुपी बँकेची आर्थिक स्थिती अतिशय वाईट असल्यामुळे आरबीआयने रुपी बँकेचा परवाना रद्द केला आहे.Recommended ArticlesNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 3 hours agoडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क3 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अखेर भुवनेश्वरने दिला ग्रीनच्या तुफानी खेळीला रेड सिग्नलIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 3 hours agoPune Crime: मैत्रीणीसोबत गप्पा मारत बसलेल्या युवकांची निर्घृण हत्यापुणे – पुण्यातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात दारूची बॉटल आणि झाडाची कुंडी घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. Pu3 hours agoरुपी को-ऑपरेटिव्ह बँकेने आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं. यामुळे रुपी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. बँकेकडे पुरेसं आर्थिक पाठबळ नसल्यामुळे आणि उत्पन्नाची शक्यता नसल्यामुळे आरबीआयकडून कारवाई करण्यात आली आहे. याची माहिती आरबीआयने ऑगस्टमध्ये ग्राहकांना दिली होती. 10 ऑगस्टला यासंदर्भातली एक प्रेस रिलीज प्रसिद्ध करण्यात आली होती.