Pramila Jayapal : अमेरिकेत भारतीय वंशाच्या खासदाराला धमकी

Home » Pramila Jayapal : अमेरिकेत भारतीय वंशाच्या खासदाराला धमकी
Pramila Jayapal : अमेरिकेत भारतीय वंशाच्या खासदाराला धमकी

Pramila Jayapal News : अमेरिकेत भारतीयांबद्दल द्वेष वाढत असून गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांवर वर्णद्वेशावरून टिका केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यानंतर आता भारतीय वंशाच्या खासदारला धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय-अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. एका व्यक्तीने जयपाल यांनी फोन करून अपशब्द बोलून भारतात परतण्याचा इशारा दिला. हेही वाचा: Video : दगडूशेठच्या दर्शनाला अजित पवारांच्या खिशात नव्हते पैसे, सुरक्षा रक्षकाने केली मदतचेन्नईत जन्मलेले खासदार जयपाल यांनी गुरुवारी पाच धमकीचे ऑडिओ संदेश सोशल मीडियावर शेअर केले. ज्यामध्ये अश्लील आणि असभ्य शब्द केले गेले आहेत. या धमकीच्या संदेशात एक व्यक्ती जयपाल यांना गंभीर परिणाम भोगण्याची आणि त्यांच्या मूळ देशात म्हणजेच भारतात परत जाण्याची धमकी देताना ऐकू येत आहे. यानंतर धमकी देणारे संदेश सार्वजनिक करणे आपल्याला योग्य वाटत असल्याचे जयपाल यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ2 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या5 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप8 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 12 minutes agoहेही वाचा: Chandrakant Patil : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत चर्चा चंद्रकांत पाटलांच्या विधानाची जयपाल हे यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सिएटलचे प्रतिनिधित्व करणारे पहिले भारतीय-अमेरिकन खासदार आहेत. त्यांना यापूर्वीदेखील अनेकदा धमक्या देण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सिएटल येथील खासदारांच्या निवासस्थानाबाहेर एका व्यक्तीने त्यांना पिस्तुल दाखवले होते. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीची ओळख ब्रेट फोर्सेल अशी करत त्याला अटक केली होती.