Share Market: अमेर‍िकन बाजारातील परिणामांमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 578 अंकांनी वधारला

Home » Share Market: अमेर‍िकन बाजारातील परिणामांमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 578 अंकांनी वधारला
Share Market: अमेर‍िकन बाजारातील परिणामांमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 578 अंकांनी वधारला

शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात चांगली तेजी दिसून आली आहे. तर आजही शेअर बाजारात मोठी उसळी दिसून येत आहे. शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 578 अंकांची वाढ दिसून आली तर निफ्टीमध्ये 194 अंकांची वाढ दिसून आली. आज सेन्सेक्स 0.98 टक्क्यांच्या तेजीसह 59,719 वर सुरू झाला तर निफ्टी 1.10 टक्क्यांच्या तेजीसह 17,816 वर सुरू झाला आहे. आज शेअर बाजारातील 23 शेअरमध्ये चांगली तेजी असून 27 शेअर घसरणीसह व्यवहार करत आहेत. काल दिवसभरात शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली. आज कशी असेल बाजाराची स्थिती?
सलग दुसऱ्या सत्रात रिलीफ रॅली सुरूच असल्याचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. प्रत्येक शॉर्ट टर्मच्या करेक्शननंतर गुंतवणूकदारांना भारतीय स्टॉक गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत असल्याचे हे संकेत आहे. अनिश्चिततेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था  चांगली कामगिरी करत असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असल्याचे ते म्हणाले.निफ्टीने 20-दिवसांच्या SMA जवळ (सिंपल मूव्हिंग एव्हरेज) हॅमर कॅंडलस्टिक फॉर्मेशन तयार केले आहे. बाजारासाठी हा नेगिटीव्ह संकेत आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये शॉर्ट टर्म सपोर्ट 17500 वरून 17700 वर सरकला आहे. जर इंडेक्स 17700 च्या खाली गेला, तर विक्रीच्या दबावाखाली 17600-17500 च्या पातळीवर पुढे सरकू शकते. दुसरीकडे, निफ्टी 17700 च्या वर गेल्यास, इंडेक्स पुन्हा 17950-17800 च्या पातळीला स्पर्श करू शकतो.
Recommended ArticlesPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.4 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या10 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ22 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप28 minutes agoनिफ्टी खाली गेल्यास, इंडेक्स पुन्हा 17400-17500 च्या सपोर्ट झोनला स्पर्श करू शकतो असे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. जर हा झोन तुटला तर निफ्टी 17200 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर निफ्टी वर जाताना दिसला तर 17920-17950 च्या दरम्यान नियर टर्म रेझिस्टन्स झोनमध्ये येईल. निफ्टी या झोनमध्ये अडकलेला दिसतो असेही ते म्हणाले.