PAK vs ENG: ‘टॉयलेटपर्यंत आमचा…’, पाकमधील सुरक्षा व्यवस्थेमुळे इंग्लंडचा फलंदाज त्रस्त

Home » PAK vs ENG: ‘टॉयलेटपर्यंत आमचा…’, पाकमधील सुरक्षा व्यवस्थेमुळे इंग्लंडचा फलंदाज त्रस्त
PAK vs ENG: ‘टॉयलेटपर्यंत आमचा…’, पाकमधील सुरक्षा व्यवस्थेमुळे इंग्लंडचा फलंदाज त्रस्त

Pakistan vs England : इंग्लंडचा संघ सध्या सात टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. 2009 मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या संघावर हल्ला झाला होता. त्यानंतर बराच काळ कोणत्याही देश तेथे खेळायला गेला नाही. काही काळापासून मोठमोठे संघ तिथे जाऊ लागले आहेत. पाकिस्ताननेही खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कडक व्यवस्था केली आहे. मात्र काही वेळा अतिसुरक्षा व्यवस्थेमुळे खेळाडू त्रस्त होऊ लागले आहे.हेही वाचा: T20 WC : ‘हे तर टरबूजा सारखे दिसतात…’ पाकिस्तानी क्रिकेटपटूने जर्सीची उडवली खिल्लीइंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुकने सुरक्षा व्यवस्थेमुळे त्रस्त झाला आहे. मॅचनंतर हॅरी ब्रूक गंमतीने म्हणाला, मी प्रत्येक वेळी टॉयलेटमध्ये जातो तेव्हा कोणीतरी माझा पाठलाग करत असतो. मी याआधी असे काहीही अनुभवले नव्हते, पण छान आहे. आम्हाला इथे खूप सुरक्षित वाटते. आम्ही सर्वजण पाकिस्तान दौऱ्याचा आणि या कडक सुरक्षेचा आनंद घेत आहोत.मोठ्या संघांचे सातत्याने आगमन होत असल्याने पाकिस्तानमधील क्रिकेटची स्थिती सुधारत आहे. पुढील वर्षी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. याशिवाय 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजनही करायचे आहे. सुरक्षेतील त्रुटींमुळे कोणतीही घटना घडू नये आणि त्यामुळे यजमानांचे नुकसान होऊ नये असे पाकिस्तानला वाटते.Recommended ArticlesAmey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली Amey Wagh Vs Sumeet Raghwan: अभिनेता अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय. आज दिवसभर या दोन्ही अभिनेत्यांमधील वादानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु आहे हे मात्र नेटकऱ्यांना समजलेलं नाही. अनेकांना हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटते3 hours agoभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना हे नियम पाळातुम्हाला भरपूर भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवायची सवय असेल तर काही नियम पाळा. 3 hours agoतळेगाव ढमढेरे येथे मिरवणुकी अभावी बैलपोळा साजरातळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे येथे लंपी आजाराच्या भीतीमुळे सर्व शेतकऱ्यांनी मिरवणूक न काढता व कसल्याही प्रकारचा डमडोल न करता साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला. बैल पोळ्यानिमित्त बैलाला पाण्याने अंघोळ घातली, रंग दिला, तसेच महिलांनी पारंपारिक पद्धतीने बैलांची पूजा करून पुरणपोळीचा घास बैलांन3 hours agoNana Patole on Devendra Fadanvis : मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही करत हे आता कळालं? पाटोळेंचा टोमणा३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्ष चांगलीच खिल्ली उडवत आहेत, यातच नाना पाटोळे यांनी फडवीसांना चांगलाच टोमणा केला.3 hours agoहेही वाचा: T20 WC : ‘हे तर टरबूजा सारखे दिसतात…’ पाकिस्तानी क्रिकेटपटूने जर्सीची उडवली खिल्लीसात सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सात विकेट्सवर 158 धावा केल्या होत्या. मोहम्मद रिझवानने 46 चेंडूत 68 तर बाबर आझमने 24 चेंडूत 31 धावा केल्या. इंग्लंडने हा सामना सहा गडी राखून जिंकला. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने 40 चेंडूत 53 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.