चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना कोर्टाचा दणका; 10 लाख भरण्याचे आदेश

Home » चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना कोर्टाचा दणका; 10 लाख भरण्याचे आदेश
चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना कोर्टाचा दणका; 10 लाख भरण्याचे आदेश

मुंबई : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. पुण्यातील ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात लाखो रूपये खर्च केल्याप्रकरणी कोर्टाने तात्कालीन संचालकांना १० लाख ७८ हजार रूपये भरण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रिया बेर्डे, अलका कुबल यांचाही सामावेश असल्याचं समोर आलं आहे. काही वर्षापुर्वी पुण्यात ‘मानाचा मुजरा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये जवळपास ५२ लाख रूपये खर्च केल्याचा आरोप संचालकांवर करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते. कोर्टाने आता या प्रकरणावर कार्यवाही करत तात्कालीन संचालकांना १० लाख ७८ हजार रूपये भरण्याचे आदेश दिले असून हे पैसे भरण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. Recommended Articlesसचिन पायलट यांच्याऐवजी निकटवर्तीयाला CM बनवण्याचा गेहलोत यांचा आग्रह? ठरावही केला
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी अशोक गेहलोत गटाचे सुमारे 56 आमदार काँग्रेसनेते शांती धारीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. धारीवाल हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. (sachin pilot news in Marathi)2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : पुन्हा स्लॉग ओव्हरचं दुखणं; टीम डेव्हिडकडून धुलाईIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.2 hours agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.3 hours agoहेही वाचा: Navneet Rana : खासदार राणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटदरम्यान, यामध्ये प्रिया बेर्डे, अलका कुबल यांच्यासारख्या अनेक मोठ्या दिग्गजांची नावे आहेत. तर कोर्टाने दिलेल्या मुदतीमध्ये पैसे भरल्यानंतर या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालकांसाठी हा मोठा धक्का आहे.