Tata motors : ‘पॉवर ऑफ 6’ चे मुंबईत आयोजन

Home » Tata motors : ‘पॉवर ऑफ 6’ चे मुंबईत आयोजन
Tata motors : ‘पॉवर ऑफ 6’ चे मुंबईत आयोजन

मुंबई : टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी १९ व २० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईमध्‍ये ‘पॉवर ऑफ ६’ एक्स्पोचे आयोजन करत आहे. या दोन दिवसांच्‍या एक्‍स्‍पोचे लक्ष्य ग्राहकांमध्ये टाटा मोटर्सच्या मोबिलिटी सोल्यूशन्सबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे आहे. या एक्स्पोमध्ये टाटा मोटर्सच्या एमएचआयसीव्‍ही (मध्यम, जड आणि मध्यवर्ती व्यावसायिक वाहने)च्या विस्तृत श्रेणीतील निवडक मॉडेल्स आणि ग्राहक केंद्रित मूल्यवर्धित सेवा ऑफरसह संपूर्ण सेवा उपक्रमांतर्गत वार्षिक देखभाल करार, फ्लीट व्यवस्थापन, अपटाइम गॅरंटी, इंधन कार्यक्षमता व्यवस्थापन उपक्रम दाखवण्‍यात येतील. ‘पॉवर ऑफ ६’ एक्स्पो कंपनीचे प्रगत कनेक्टेड वाहन प्लॅटफॉर्म फ्लीट एज व त्‍याची कार्यक्षमता आणि फ्लीट मालकांच्या नफ्याची क्षमता सुधारण्यासाठी तिच्या अद्वितीय क्षमतांचे प्रदर्शन देखील करेल. अद्वितीय ‘पॉवर ऑफ ६’ एक्स्पो परिसंस्‍था भागधारकांना नवीनतम ऑफर समजून घेण्यास आणि अनुभवण्यास सक्षम करेल.टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांची श्रेणी ७६ वर्षांहून अधिक काळ राष्ट्रनिर्मितीत योगदान देत आहे. बांधकाम आणि मालवाहतूक विभागातील अग्रणी कंपनीने २ लाखांहून अधिक बीएस-६ एमएचआयसीव्‍ही ट्रक्‍स सादर केले आहेत.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावरSep 25, 2022IND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 तSep 25, 2022Mumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.Sep 25, 2022’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमSep 25, 2022ही श्रेणी विविध लोड बॉडी प्रकार, टिपर, टँकर, बल्कर्स आणि ट्रेलर्स अशा फुली-बिल्‍ट रचनांमध्‍ये उपलब्‍ध आहे. एमएचसीव्‍ही ट्रक्‍सची श्रेणी मार्केट लोड, शेती, सिमेंट, लोखंड व स्‍टील, कंटेनर, वाहन वाहक, पेट्रोलियम, रसायन, पाण्याचे टँकर, एलपीजी, एफएमसीजी, व्‍हाइट गूड्स, नाशवंत वस्तू, बांधकाम, खाणकाम, नगरपालिका कार्यसंचालने अशा सर्वसमावेशक मालांच्या वाहतूकीच्‍या गरजांची पूर्तता करत आहे-. टाटा मोटर्सची आयसीव्‍ही श्रेणी डिझेल आणि सीएनजी पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध आहे. ही श्रेणी रचना, कार्यक्षमता आणि विविध उपयोजनांसाठी प्रसिद्ध आहे. झपाट्याने वाढणाऱ्या ई-कॉमर्स विभागाच्या खास गरजा पूर्ण करण्यासाठी आणि ग्राहकांना नफा वाढविण्यात मदत करण्यासाठी ही श्रेणी तयार करण्यात आली आहे.