प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? हेमंत ढोमेच ट्विट चर्चेत..

Home » प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? हेमंत ढोमेच ट्विट चर्चेत..
प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? हेमंत ढोमेच ट्विट चर्चेत..

hemant dhome : अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याचा झिम्मा चित्रपट नुकताच येऊन गेला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हेमंत एक संवेदनशील कलाकार आहे. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर कायमच भाष्य करत असतो. आज राष्ट्रीय चित्रपट दिन आहे (national cinema day) या निमित्ताने देशभरात आज 75 रुपयात चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यावरच आज हेमंतने एक ट्विट केले आहे. अत्यंत सूचक अशा या ट्विटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहेत. (marathi actor hemant dhome tweet on ticket rate of films and audience national cinema day)यंदा चित्रपटगृह व्यावसायिकांनी एकत्र येऊन २३ सप्टेंबर राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्याचं ठरवलं आहे. याच औचित्य साधून प्रेक्षकांनी कमीत कमी खर्चात चित्रपटांचा आनंद घेता यावा यासाठी ७५ रुपये तिकिटाची घोषणा करण्यात आली. यादिवशी कोणताही चित्रपट तुम्ही ७५ रुपयांमध्ये बघू शकतात. या संकल्पनेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अक्षरशः सगळे शो हाऊसफुल्ल जात आहेत. याच परिस्थितीवर अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने ट्विट केले आहे. Recommended Articlesआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.2 hours agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी2 hours agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 hours ago”आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी ७५ रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्या नंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केलीय! सगळीकडे मराठी चित्रपट हाऊसफुल्ल! म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात? प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का’?” असे ट्विट त्याने केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्याने एका गंभीर प्रश्नाला हात घातला आहे. आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी ७५ रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्या नंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केलीय! सगळीकडे मराठी चित्रपट हाऊसफुल्ल!
म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात?
प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? #NationalCinemaDay pic.twitter.com/tzpaQMtPgB— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) September 23, 2022 हेमंतच्या या मताला अनेकांनी सहमती दर्शवली आहे. याशिवाय चित्रपटगृहात मिळणाऱ्या महागड्या खाद्यपदार्थाविषयी देखील नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हेमंत हा उत्तम दिग्दर्शक आहे. ‘बघतोस काय मुजरा कर’ सारख्या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. नुकताच त्याचा ‘झिम्मा’ हा चित्रपट येऊन गेला होता. ‘चोरीचा मामला’, ‘ऑनलाईन बिनलाईन’, ‘क्षणभर विश्रांतीसारख्या’ मराठी चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. लवकरच त्याचा ‘सनी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.