Dananeer Mobeen : सुंदर दिसण्यासाठी काहीही; पावरी गर्लने ओठाला लावली मिरची पूड अन्…

Home » Dananeer Mobeen : सुंदर दिसण्यासाठी काहीही; पावरी गर्लने ओठाला लावली मिरची पूड अन्…
Dananeer Mobeen : सुंदर दिसण्यासाठी काहीही; पावरी गर्लने ओठाला लावली मिरची पूड अन्…

Dananeer Mobeen Latest News सोशल मीडियावर कधी कोण स्टार बनेल सांगता येत नाही. यासाठी केवळ एक व्हिडिओही पुरेसा असतो. व्हायरल व्हिडिओ (Viral Video) एखाद्याला काही मिनिटांतच जगभरात प्रसिद्धी मिळवून देऊ शकतो. यापैकीच एक दनानीर मुबीन (Dananeer Mobeen). साधारण दोन वर्षांपूर्वी दनानीर मुबीनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. तेव्हापासून पाकिस्तानची (Pakistan) डिजिटल क्रिएटर दनानीर मुबीन ही पावरी गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली. याच पावरी गर्लचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला आहे. या व्हिडिओमुळे तिला ट्रोल देखील व्हावं लागत आहे.साधारण दोन वर्षांपूर्वी दनानीरने (Dananeer Mobeen) मित्रांसोबत एक व्हिडिओ (Viral Video) बनवला होता. तिचा हा पावरी व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय झाला होता. ‘पावरी हो रही है’ म्हणत त्यावेळी अनेकांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आता दनानीरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने ओठ मोठे दिसण्यासाठी काय घरगुती उपाय करता येतील हे सांगितले आहे.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या1 hours agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप1 hours agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 1 hours agoदनानीरने घरगुती लिपबाम तयार केला आहे. यासाठी तिने आधी वॅसलीन घेतले. त्यात थोडीशी मिरची पूड टाकली आणि थोडी दालचिनी पावडर टाकली. सगळं एकत्र करून हे मिश्रण तिने ओठांना लावले. हे मिश्रण किमान पाच मिनिटं ठेवावे असे ती सांगत आहे. मात्र, हा खतरनाक लेप तिलाही सहन झाला नाही. ओठांची जळजळ होत असल्याचे तिने सांगितले. पाच मिनिटांच्या आतच तिने लेप पुसून टाकला.हेही वाचा: Baby Shower : बिपाशा बसूच्या बेबी बंपनंतर बेबी शॉवरचे आमंत्रणही वेगळेदनानीर चांगलीच घामाघूम झालीमिरची पूड लावल्याने दनानीर चांगलीच घामाघूम झाली. अखेर तिने हा घरगुती उपाय न करण्याचा सल्ला दिला आहे. ओठ मोठे दिसण्यासाठी ही ट्रिक अजिबात करू नका असे तिने सांगितले. यामुळे ओठ मोठे होत असले तरी ओठांची प्रचंड जळजळ होते. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले ‘मी घरच्या घरी बनवलेले हे लिप प्लंपर ट्राय केले. मात्र, हे लक्षात आले की ओठ मुळातच खूप सुंदर आहेत. मात्र, हे खूपच वेदनादायक असल्यामुळे घरी अजिबात ट्राय करू नका.’दनानीरला अनेकांनी केले ट्रोलया व्हिडिओवर कमेंट करीत दनानीरला अनेकांनी ट्रोल केले आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माथिराने कमेंटमध्ये लिहिले, ‘कुणी ओठांना मिरची पूड लावण्याचा सल्ला कस काय देऊ शकते. गुगलवरील प्रत्येक गोष्ट योग्य असतेच असे नाही.’ अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींनी हे खतरनाक असल्याचे म्हटले आहे.