बाजार सुरू आधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

Home » बाजार सुरू आधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?
बाजार सुरू आधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

यूएस फेड रेटचा निर्णय 21 सप्टेंबरला अर्थात आज होणार आहे, पण मंगळवार, 20 सप्टेंबरला तो देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या रडारवर राहिला. भारतीय शेअर बाजारात मंगळवारी अस्थिरता होती. पण सलग दुसऱ्या दिवशी बाजार तेजीसह बंद झाला.

बीएसई सेन्सेक्स 578.5 अंक अर्थात 0.98 टक्क्यांनी वाढून 59,720 वर पोहोचला. तर निफ्टी 194 अंकांनी अर्थात 1.1 टक्क्यांनी वाढून 17,816 वर बंद झाला.
हेही वाचा: Stock: या स्मॉल कॅप स्टॉकचा 3 वर्षात 111% परतावा, आता देणार 100% डिव्हिडेंडआज कशी असेल बाजाराची स्थिती?
सलग दुसऱ्या सत्रात रिलीफ रॅली सुरूच असल्याचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. प्रत्येक शॉर्ट टर्मच्या करेक्शननंतर गुंतवणूकदारांना भारतीय स्टॉक गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत असल्याचे हे संकेत आहे. अनिश्चिततेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था  चांगली कामगिरी करत असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असल्याचे ते म्हणाले.Recommended ArticlesNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 3 hours agoडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क3 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अखेर भुवनेश्वरने दिला ग्रीनच्या तुफानी खेळीला रेड सिग्नलIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 3 hours agoPune Crime: मैत्रीणीसोबत गप्पा मारत बसलेल्या युवकांची निर्घृण हत्यापुणे – पुण्यातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात दारूची बॉटल आणि झाडाची कुंडी घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. Pu3 hours agoनिफ्टीने 20-दिवसांच्या SMA जवळ (सिंपल मूव्हिंग एव्हरेज) हॅमर कॅंडलस्टिक फॉर्मेशन तयार केले आहे. बाजारासाठी हा नेगिटीव्ह संकेत आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये शॉर्ट टर्म सपोर्ट 17500 वरून 17700 वर सरकला आहे. जर इंडेक्स 17700 च्या खाली गेला, तर विक्रीच्या दबावाखाली 17600-17500 च्या पातळीवर पुढे सरकू शकते. दुसरीकडे, निफ्टी 17700 च्या वर गेल्यास, इंडेक्स पुन्हा 17950-17800 च्या पातळीला स्पर्श करू शकतो.

निफ्टी खाली गेल्यास, इंडेक्स पुन्हा 17400-17500 च्या सपोर्ट झोनला स्पर्श करू शकतो असे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. जर हा झोन तुटला तर निफ्टी 17200 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर निफ्टी वर जाताना दिसला तर 17920-17950 च्या दरम्यान नियर टर्म रेझिस्टन्स झोनमध्ये येईल. निफ्टी या झोनमध्ये अडकलेला दिसतो असेही ते म्हणाले.हेही वाचा: BSE सेन्सेक्स 5 लाखांपर्यंत जाईल! Rakesh Jhunjhunwala चा छातीठोक दावा आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?अपोलो हॉस्पिटल (APPOLOHOSP)सिप्ला (CIPLA)सनफार्मा (SUNPHARMA) आयशर मोटर्स (EICHERMOTORS)डॉ. रेड्डी (DRREDDY)टायटन (TITAN)भारतफोर्ज (BHARATFORG)लॉरस लॅब (LAURUSLAB)पेज इंडिया (PAGEINDIA)ऑरो फार्मा (AUROPHARMA)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.