T20 World Cup : रोहित शर्माला शोधावी लागणार ‘या’ प्रश्नांची उत्तरे, आता फक्त…

Home » T20 World Cup : रोहित शर्माला शोधावी लागणार ‘या’ प्रश्नांची उत्तरे, आता फक्त…
T20 World Cup : रोहित शर्माला शोधावी लागणार ‘या’ प्रश्नांची उत्तरे, आता फक्त…

Rohit Sharma T20 World Cup 2022 Team India : यंदा टी20 विश्वचषकाचा थरार ऑस्ट्रेलियामध्ये आक्टोबर- नोव्हेबर महिन्यात रंगणार आहे. विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत, पण टीम इंडियाचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. परंतु भारतीय संघ अद्याप आपली प्लेइंग इलेव्हन ठरवू शकलेला नाही.हेही वाचा: IPL 2023 संदर्भात BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची मोठी घोषणा; पुढील वर्षापासून…रोहित शर्माला विश्वचषक 2022 पूर्वी 6 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तयारी मजबूत करण्याची संधी आहे, ज्यामध्ये तो एक गमावला आहे. मोहाली टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. येथे संघाचे क्षेत्ररक्षण आणि डेथ बॉलिंग पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. त्याचवेळी पंत की डीके यांचाही प्रश्न अद्याप सुटला नाही.टीम इंडियासाठी समस्या आहे की जडेजाच्या दुखापतीनंतर टॉप 6 मध्ये एकही डावखुरा फलंदाज नाही. संघ व्यवस्थापनाकडे यष्टिरक्षक म्हणून पंत किंवा डीके यांच्यापैकी एकाची जागा रिक्त आहे. कार्तिक फिनिशरची भूमिका चोख बजावत असताना, मधल्या फळीत डाव्या हाताच्या फलंदाजाची पोकळी भरून काढणारा पंत हा एकमेव फलंदाज आहे. अशा परिस्थितीत आता कोणाला संधी द्यायची हे पाहावे लागेल. Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ40 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या43 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप46 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 50 minutes agoहेही वाचा: Video: IND vs AUS तिकीट खरेदीसाठी प्रेक्षकांची झुंबड; पोलिसांचा लाठीचार्जभारताची आजून एक समस्या म्हणजे डेथ ओव्हर्स आहे. आशिया चषक 2022 मधून असे दिसून आले आहे की भारतीय गोलंदाज सुरुवातीला प्रभावी दिसत आहे. पण शेवटच्या काही षटकात विरोधी फलंदाजांना ते रोखू शकले नाहीत. त्यापैकी सर्वात मोठी समस्या भुवनेश्वर कुमारची डेथ बॉलिंग आहे. रोहितने प्रत्येक वेळी भुवीवर 19 वे षटक टाकण्याचा विश्वास ठेवला. परंतु त्याने प्रत्येक वेळेस निराशाजनक कामगिरी केली. जसप्रीत बुमराहच्या आगमनाने डेथ ओव्हर्स मध्ये नक्कीच सुधारणा होईल, पण बुमराहला दुसऱ्या टोकाचीही मदत लागेल.हेही वाचा: Ind vs Aus : टीम इंडिया नाही जिंकणार टी-20 मालिका? नागपुरातून आली वाईट बातमीटीम इंडियासाठी शेवटची आणि महत्त्वाची समस्या म्हणजे खेळाडूंची दुखापत आहे. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला, तर बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे पहिल्या टी-20 मध्ये संघाचा भाग नव्हता. कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मोहम्मद शमी या मालिकेतून बाहेर पडला आहे. विश्वचषकापूर्वी किंवा स्पर्धेदरम्यान एक-दोन भारतीय गोलंदाज जखमी झाले, तर टीम इंडियासाठी अनेक अडचणी निर्माण होतील. दीपक चहर आणि मोहम्मद शमी बौतार यांची स्टँडबाय वेगवान गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. शमी 2021 च्या विश्वचषकानंतर भारतासाठी टी-20 खेळला नाही, तर चहर दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे.