Pension scheme : या विशेष खात्यामध्ये पैसे गुंतवलेत तर मिळेल ३६ हजार पेन्शन

Home » Pension scheme : या विशेष खात्यामध्ये पैसे गुंतवलेत तर मिळेल ३६ हजार पेन्शन
Pension scheme : या विशेष खात्यामध्ये पैसे गुंतवलेत तर मिळेल ३६ हजार पेन्शन

मुंबई : आजच्या काळात प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे. नोकरीनंतर म्हातारपणाची चिंता असते. अशा परिस्थितीत, कमी पगार असलेल्या लोकांसाठी, सरकार अशी योजना चालवत आहे, ज्यामुळे तुम्हाला घरी बसून वार्षिक ३६ हजार पेन्शन मिळेल.सध्या सरकार अनेक बचत योजना चालवत आहे. त्यापैकी प्रधानमंत्री जन धन योजना खाते हे विशेष आहे. ज्या अंतर्गत लोकांना ३ हजार रुपये मासिक पेन्शन मिळते. (Pradhan Mantri Jan Dhan Yojana Account)तुमचेही जन धन योजनेत खाते असल्यास, पीएम श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत सरकार खातेधारकांना ३,००० रुपये देईल. या योजनेसाठी माफक गुंतवणूक आवश्यक आहे.वृद्धापकाळात पेन्शनची व्यवस्था असेल. या योजनेअंतर्गत, संपूर्ण ३ हजार रुपये प्रति महिना म्हणजेच वार्षिक ३६ हजार रुपये सरकार जन धन खातेधारकांना पाठवते. या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात.Recommended ArticlesPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.4 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या10 minutes agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ22 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप28 minutes agoकोण घेऊ शकतो लाभ ?प्रधानमंत्री जन धन योजना खात्यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळेल. ज्यामध्ये रस्त्यावरील विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरकामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर घेऊ शकतात. तुमचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.PMJDY खाते पेन्शनसाठी गुंतवणूक कशी करावी ?PMJDY खाते पेन्शन मिळविण्यासाठी, वेगवेगळ्या वयोगटानुसार दरमहा ५५ ते २०० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर तुम्हाला दरमहा ५५ रुपये गुंतवावे लागतील. ३० वर्षांच्या लोकांना १०० रुपये आणि ४० वर्षांच्या लोकांना २०० रुपये भरावे लागतील.