Health Tips : पेरूच्या पानांचे हे ५ फायदे वाचून थक्क व्हाल !

Home » Health Tips : पेरूच्या पानांचे हे ५ फायदे वाचून थक्क व्हाल !
Health Tips : पेरूच्या पानांचे हे ५ फायदे वाचून थक्क व्हाल !

पुणे : पेरू एक आंबट-गोड फळ असून ते आतून पांढरे अथवा लालसर असते. अनेकांना पेरू खायला आवडतो. पेरू फळाची चव आणि आरोग्यदायी फायदे सर्वसामान्यपणे सर्वांना माहीत आहेत. पण खूप कमी लोकांना याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत. पेरूच्या पानांमध्ये भरपूर औषधी घटक असतात, जे तुमचे आरोग्य उत्तम राखण्याचे काम करतात. पेरूसोबतच त्याच्या पानाचे देखील आरोग्यासाठी खूप फायदे आहेत.एनसीबीआय (National Center for Biotechnology Information) च्या मते, पेरूची पाने नैसर्गिक औषध म्हणून काम करतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. पेरूच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीबॅक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यासोबतच यामध्ये पॉलिफेनॉल, कॅरोटीनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन ही रसायने आढळतात. जे विविध रोगांवर उपचार करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर18 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त19 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.19 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम25 minutes agoतज्ज्ञांच्या मते, पेरूच्या फळाबरोबरच त्याच्या बिया, साल आणि पाने हे सर्व गुणधर्मांनी भरलेले आहेत. जगभरात पेरूच्या पानांचा रस पारंपारिक औषधात वापरतात. जपानमधील लोक हर्बल टी बनवण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर करतात. चला जाणून घेऊया पेरूचे आरोग्यासाठी फायदे.मधुमेह नियंत्रण करतेनॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन नुसार, पेरूच्या पानांमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असतात. यामध्ये असलेले फिनोलिक कंपाऊंड शरीरात तयार होणारी अतिरिक्त साखर नियंत्रित करण्याचे काम करते.वजन कमी करतेपेरूच्या पानांमध्ये अनेक बायोएक्टिव्ह कंपाऊंड असतात, जे तुमच्या शरीरात कार्बोहायड्रेट्स रोखून ठेवण्याचे काम करतात. तसेच, ते शरीरातील साखर आणि कॅलरीजचे प्रमाण कमी करतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतातपेरूची पाने शरीरातील हायपरग्लाइसेमिया म्हणजेच साखरेचे प्रमाण कमी करण्यास देखील मदत करतात. जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात. याशिवाय, पेरूच्या पानांमध्ये हायपोलिपिडेमिक गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होते.डाइरीयावर उपयोगीपेरूच्या पाने डायरीया (अतिसार) कमी करणारे गुणधर्म असतात. पेरूच्या पानांमध्ये असलेले अँटी-हेल्मिंथिक गुणधर्म पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर करतात. तसेच, हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात.शुक्राणूंची संख्या वाढतेपेरूच्या पानांच्या मदतीने शुक्राणूंची संख्या वाढवली जाऊ शकते. प्रजनन क्षमता वाढविण्यास पेरूची पाने गुणकारी आहेत. या पानांच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांचा शुक्राणूंच्या विषारीपणावर फायदेशीर प्रभाव पडतो. ज्यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते.कसा करावा पेरूच्या पानांचा चहाचार मोठी ताजी पेरूची पाने स्वच्छ धुवून घ्या. कढईत एक कप पाणी गरम करून त्यात पेरूची पाने घाला. पाच मिनिटे उकळू द्या. आता पाने गाळून पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. चवीनुसार थोडे मध घाला. तयार आहे तुमचा चहा.