3 रुपयांचा शेअर बाराशे रुपयांवर; केवळ 30 हजारांत गुंतवणुकदार बनले कोट्यधीश

Home » 3 रुपयांचा शेअर बाराशे रुपयांवर; केवळ 30 हजारांत गुंतवणुकदार बनले कोट्यधीश
3 रुपयांचा शेअर बाराशे रुपयांवर; केवळ 30 हजारांत गुंतवणुकदार बनले कोट्यधीश

शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी गेल्या 2 दशकात केवळ काही हजार किंवा लाखांची गुंतवणूक करून आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. टाइल्स निर्माता कजारिया सिरॅमिक्स लिमिटेड (Kajaria Ceramics Limited) ही अशीच एक कंपनी आहे. यात गुंतवणूकदारांनी 23 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली आणि ती आजपर्यंत कायम ठेवली, त्यांच्या गुंतवलेल्या पैशाची किंमत आज सुमारे 350 पटींनी वाढली आहे.कजारिया सिरॅमिक्स लिमिटेडचे शेअर्स 19 सप्टेंबर 2022 ला एनएसईवर 1,191 रुपयांवर बंद झाले. पण 23 वर्षांपूर्वी, 1 जानेवारी 1999 रोजी, जेव्हा कजारिया सिरॅमिक्सच्या शेअर्सने एनएसईवर व्यवहार करायला सुरुवात केली तेव्हा त्याची किंमत फक्त 3.40 रुपये होती. अशाप्रकारे, गेल्या 23 वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 34,930 टक्के इतका चांगला परतावा दिला आहेRecommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ22 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या25 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप28 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 32 minutes agoहेही वाचा: गुगल सर्चिंगबाबत ‘ही’ चूक करत असाल तर तुम्हालाही तुरुंगात जावं लागेलं..एखाद्या गुंतवणूकदाराने 1 जनवरी 1999 ला कजारिया सिरॅमिक्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ते आजपर्यंत कायम ठेवले असते तर आज त्याची किंंमत साडेचार कोटी रुपये झाली असती. दुसरीकडे, एखाद्या गुंतवणूकदाराने त्या वेळी केवळ 30 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती, तरी आज त्याचे 1 कोटी 5 लाख रुपये झाले असते.गेल्या एका महिन्यात त्याच्या शेअर्समध्ये 1.08 टक्के वाढ झाली आहे, तर गेल्या एका वर्षात त्याच्या शेअर्सची किंमत 4.43 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी, गेल्या 5 वर्षात त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 64.66 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.कजारिया सिरॅमिक्स ही भारतातील सिरेमिक आणि विट्रिफाइड टाइल्सची सर्वात मोठी उत्पादक आहे. त्याचे बाजार भांडवल सुमारे 19.05 हजार कोटी रुपये आहे आणि त्याचे शेअर्स सध्या 44.50 च्या P/E रेशोवर व्यवहार करत आहेत.हेही वाचा: Share Market : येत्या आठवड्यात ‘हे’ 5 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्लानोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.