Health News : दही की ताक?, आयुर्वेदानुसार शरीरासाठी फायदेशीर काय?

Home » Health News : दही की ताक?, आयुर्वेदानुसार शरीरासाठी फायदेशीर काय?
Health News : दही की ताक?, आयुर्वेदानुसार शरीरासाठी फायदेशीर काय?

अनेक लोक ताकापेक्षा दही खाण्यास अधिक पंसदी दर्शवतात. त्यामुळे दही तुलनेत सर्वाधिक लोकप्रिय आहे असे म्हटले जाते. उत्तम पचन आणि आरोग्यासाठी नियमित आहारात दह्याचा समावेश करा असा सल्ला डॉक्टर देतात. तज्ज्ञ दह्यापेक्षा ताकाला प्राधान्य दिले पाहिजे असे सांगतात. कारण ते पचायला हलके असते. याशिवाय आयुर्वेदानुसार ताक हे शरीराला आरोग्यासाठी चांगले आहे. पण दही आणि ताक दोन्ही सारख्याच प्रक्रियेने बनवले जातात.तज्ज्ञ काय सांगतात?साधारणत: दह्यावर तापमानवाढीचा प्रभाव असतो. ताक नैसर्गिकरित्या थंड होते. दहीमध्ये सक्रिय बॅक्टेरियाचा ताण असतो जो उष्णतेच्या संपर्कात आल्यावर आंबतो. म्हणून जेव्हा आपण दही खातो तेव्हा ते पोटातील उष्णतेच्या संपर्कात येते आणि अधिक आक्रमकपणे आंबायला लागते. त्यामुळे शरीर थंड होण्याऐवजी गरम होते, असे तज्ज्ञांते मत आहे.Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर18 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त19 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.19 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम25 minutes agoआयुर्वेदानुसार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ताकाने असे होत नाही. कारण दह्यामध्ये पाणी घालताच किण्वन प्रक्रिया थांबते. ताकामध्ये जिरेपूड, मीठ यांसारखे मसाले टाकल्याने त्याचे शरीरासाठी आणखी फायदे होतात. पचनास मदत करण्यासाठी अनेक भारतीय पदार्थांत हिंग, आले, मिरची आणि कढीपत्त्यामध्ये तूप मिसळले जाते. ताक हे नैसर्गिकरित्या थंड असते मात्र दह्याला शरीरात पचण्यासाठी अधिक वेळ लागतो.हेही वाचा: Tea : तुम्हालाही जेवल्यानंतर चहा प्यायची सवय आहे का?, मग वेळीच सावध व्हा.. आयुर्वेदानुसार दही खाण्याचे नियम…तज्ज्ञांच्या मते दही हे आंबवलेले असते. ते चवीला आंबट, गरम आणि पचायला जड असते. ते चरबी वाढवण्यास कारणीभूत असते. यामुळे शरीरातील असंतुलन कमी होते आणि शरीर स्थिर करण्यास मदत होते. मात्र तरीही काही बाबतीत दही खाणे टाळावे कारण तुम्हाला जर लठ्ठपणा, कफाचे विकार, रक्तस्त्राव, दाहक विकार, जडपणा वाढणे आणि संधिवात असेल तर दही खाणे टाळा.रात्रीचे दही खाणे टाळावे कारण त्यामुळे सर्दी, खोकला, सायनस होऊ शकतो. पण जर तुम्हाला रात्री दही खाण्याची सवय असेल तर त्यात चिमूटभर काळी मिरी किंवा मेथी टाका. दही गरम करणे टाळा. कारण ते सर्व बॅक्टेरिया नष्ट करते. त्वचेचे विकार, पित्ताचे असंतुलन, डोकेदुखी, झोपेचा त्रास आणि पचनाचे विकार असलेल्या लोकांसाठी दही खाणे योग्य नाही.हेही वाचा: Pondicherry : निळ्याशार पाण्याचा अनुभव घ्यायचा आहे? मग एकदा पुदुच्चेरीला भेट द्या..दह्याऐवजी ताकचा वापर करा कारण…ताकाचा उपयोग आरोग्यासाठी आणि रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. ताक हे पचायला सोपे, तुरट आणि आंबट चवीचे असते. अशा स्थितीत पचनक्रिया सुधारते आणि तिन्ही प्रकारच्या शरीरासाठी याचा उपयोग होतो. हिवाळ्यातील अपचनाच्या उपचारासाठीही ताक हे फायदेशीर आहे. दह्याऐवजी ताक हा नेहमीच एक उत्तम पर्याय म्हणून मानला जातो. हे मानवासाठी अमृत समतुल्य असल्याचे म्हटले जाते. १ ग्लास पाण्यात २ चमचे दही, थोडी जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून तुम्ही पिऊ शकता.