सुबोध भावे चक्क शॉर्ट फिल्म मध्ये, साकारणार ‘धर्माभिमानी हिंदूची’ भूमिका..

Home » सुबोध भावे चक्क शॉर्ट फिल्म मध्ये, साकारणार ‘धर्माभिमानी हिंदूची’ भूमिका..
सुबोध भावे चक्क शॉर्ट फिल्म मध्ये, साकारणार ‘धर्माभिमानी हिंदूची’ भूमिका..

subodh bhave : मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणजेच सुबोध भावे (subodh bhave). सुबोध वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका नेहमी साकारत असतो आणि त्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक चरित्र भूमिका साकारणारा असा हा महत्वाचा अभिनेता आहे. आज मराठीमध्ये सुपरस्टार अशी त्याची ख्याती होत आहे. सुबोध नाटक, मालिका, चित्रपट सारवहक माध्यमात शिताफीने काम करतो. पण यंदा त्याने चक्क शॉर्ट फिल्म हे माध्यम निवडलं आहे. लवकरच त्यांची ‘अंतःकरण’ ही शॉर्टफिल्म येत आहे. (subodh bhave new short film antahkaran poster release) सुबोधची ‘अंत:करण’ ही शाॅर्टफिल्म याच महिन्याच युट्यूबवर रिलीज होणार आहे. त्याबद्दल  त्यानं सोशल मीडियावर माहिती दिली आहे. सुबोधनं लिहिलं आहे, ‘एका धर्माभिमानी हिंदूची ही कथा आहे. तो दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या सहकाऱ्यांमध्ये अडकला असून दोघंही त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत.’ ही शाॅर्टफिल्म २७ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता रिलीज होणार आहे.Recommended Articlesकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 59 minutes agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या60 minutes agoPune : यंदा मान्सून १२० टक्के बरसलाखडकवासला : यंदाचा मान्सून खडकवासला धरण साखळीत धरणात १२० टक्के बरसला. हा सर्वाधिक पाऊस पानशेत- वरसगावमध्ये झाला. खडकवासला धरणातून आज अखेर सुमारे ३१ टीएमसी पाणी सोडले आहे. तरी ही चार धरणात आज अखेर २९.११ टीएमसी म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत.1 hours agoबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ1 hours ago View this post on Instagram A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave) ही शॉर्ट फिल्म ‘पाॅकेट फिल्म्स’या युट्यूब चॅनेलवर पाहता येईल. या फिल्ममध्ये सुबोधबरोबर अभिनेता सचित पाटील आणि रवी काळे आहेत. अभिषेक गुणाजी आणि संदीप बाणकेश्वर यांनी फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. अभिषेक हा मिलिंद गुणाजी यांचा मुलगा आहे. या शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून सुबोधला एका नवीन भूमिकेत पाहता येणार आहे.