IPL 2023 संदर्भात BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची मोठी घोषणा; पुढील वर्षापासून…

Home » IPL 2023 संदर्भात BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची मोठी घोषणा; पुढील वर्षापासून…
IPL 2023 संदर्भात BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची मोठी घोषणा; पुढील वर्षापासून…

IPL 2023 Format Big UPDATE : आयपीएलचे स्वरूप पुढील वर्षीपासून पुन्हा बदलणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुढील वर्षापासून म्हणजेच 2023 च्या सीझनपासून आयपीएल कोविड-19 पूर्वीच्या जुन्या फॉर्मेटमध्ये परत येणार आहे, ज्यामध्ये संघ त्यांच्या घरच्या मैदानावर आणि विरोधी संघाच्या मैदानावर सामने खेळणार आहे. 2020 मध्ये यूएई, दुबई, शारजा आणि अबू धाबी या तीन ठिकाणी रिकाम्या स्टेडियममध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते. 2021 मध्ये ही T20 स्पर्धा दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि चेन्नई या चार ठिकाणी आयोजित करण्यात आली. आता महामारी नियंत्रणात आहे त्यामुळे ही लीग घरच्या मैदानावर आणि विरोधी संघाच्या मैदानावर जुन्या फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.Recommended Articles’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम5 minutes agoअण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद नरेंद्र पाटलांनाच देणार: मुख्यमंत्र्यांच अश्वासन माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्यालात रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांना विनम्र आदरांजली अर्पण केली. त्यावेळी एकनाथ शिंदे या8 minutes agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव14 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 15 minutes agoहेही वाचा: IND vs AUS: पावसाचे संकट, तरीही पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांची अग्निपरीक्षाबीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याबाबत म्हणाले की, ‘आयपीएल पुढील वर्षापासून घरच्या मैदानावर आणि विरोधी संघाच्या मैदानावर सामने (होम-अवे) खेळण्याच्या फॉरमॅटमध्ये आयोजित केले जाईल. सहभागी १० संघ त्यांच्या घरच्या मैदानावर आपापले सामने खेळतील. बीसीसीआयने या संदर्भातील पत्र राज्य संघटनांना पाठवले आहे. 2020 नंतर प्रथमच BCCI आपला संपूर्ण देशांतर्गत हंगाम आयोजित करत आहे. हेही वाचा: ॲशेस मालिकेचा थरार १६ जूनपासूनयाशिवाय गांगुलीने महिला आयपीएलबाबतही भूमिका स्पष्ट केली. गांगुली म्हणाले की, बीसीसीआय सध्या महिला आयपीएल आयोजित करण्यावर काम करत आहे. त्याचा पहिला हंगाम पुढील वर्षीच्या सुरुवातीला आयोजित केला जाऊ शकतो. महिलांच्या IPL व्यतिरिक्त BCCI 15 वर्षांखालील मुलींची एकदिवसीय स्पर्धा देखील आयोजित करणार आहे. ही स्पर्धा २६ डिसेंबर ते १२ जानेवारी या कालावधीत बंगळुरू, रांची, राजकोट, इंदूर, रायपूर व पुणे येथे खेळल्या जाईल.