Tea : तुम्हालाही जेवल्यानंतर चहा प्यायची सवय आहे का?, मग वेळीच सावध व्हा..

Home » Tea : तुम्हालाही जेवल्यानंतर चहा प्यायची सवय आहे का?, मग वेळीच सावध व्हा..
Tea : तुम्हालाही जेवल्यानंतर चहा प्यायची सवय आहे का?, मग वेळीच सावध व्हा..

तुम्ही जर चहाप्रेमी असाल आणि चहा हे तुमच्या अत्यंत आवडीचं आणि जवळचं एक पेय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आपल्यापैकी बहुतेकांना सकाळी उठल्यानंतर आधी चहा लागतो. चहाशिवाय आमची सकाळ फ्रेश होत नाही असं वाक्य तुम्ही अनेकांकडून ऐकलं आहे. इथून जो चहाचा प्रवास सुरु होतो तो दिवसभर आणि अगदी रात्रीपर्यंत सुरु असतो. मग या संपूर्ण वेळात आपण किती चहा प्यायलो, याची खबरबादही अनेकांना नसते. मग यामुळे पित्त, जळजळ सुरु होते. सकाळी किंवा दिवसभर जेवणानंतर एक कप चहा पिण्याची सवय आपल्यापैकी अनेकांना आहे मात्र ही सवय बदलण्याची गरज आहे. कारण जेवणानंतर चहा पिण्याची ही सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. चहामध्ये कॅफिन असते. जे शरीरात कॉर्टिसॉल किंवा स्टेरॉइड हार्मोन्स वाढवते. त्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आज आपण जेवल्यानंतर चहा पिल्याने आरोग्याला काय नुकसान होते ही माहिती पाहणार आहोत…Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर18 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त19 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.19 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम25 minutes agoहेही वाचा: ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांमध्ये जन्मजात दोष असतात; काय सांगते अंकशास्त्र?जेवणानंतर चहा पिल्याने काय नुकसान होते?रक्तदाब वाढतोजे लोक जेवणानंतर चहा पितात त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असू शकतो. चहामध्ये कॅफिन असते, त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. जर तुम्ही आधीच उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर जेवणानंतर चहा पिऊ नका.हृदयासाठी हानिकारकजेवणानंतर लगेच चहा पिल्यास पचनसंस्थेशी संबंधित समस्या (पचनसंस्थेच्या समस्या वाढवा) उद्भवू शकतात. अन्न खाल्ल्यानंतर लगेच चहा पिल्याने शरीराची पचनक्रिया कमकुवत होते. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. इतकंच नाही तर त्यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्वही मिळत नाहीत. चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने माणसाला गॅस, अॅसिडिटीचा त्रास होऊ लागतो.डोकेदुखीचे कारणजेवणानंतर चहा घेतल्यास डोकेदुखी होऊ शकते. जेवल्यानंतर लगेचच चहा पिल्याने शरीरात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या निर्माण होते. शरीरात गॅस तयार झाल्यामुळे डोकेदुखीचा त्रास जाणू शकतो. तुम्हाला जर अशी सवय असेल तर ती लगेच सोडा. या सवयींमुळे तुमचे हृदय आजारी पडू शकते. असे केल्याने हृदयाचे ठोकेही वेगवान होतात.हेही वाचा: Astro Tips : संपत्ती वाढवण्यासाठी दालचिनीच्या ‘या’ चमत्कारिक युक्त्या येतील कामी..लोहची कमतरता जाणवतेजेवणानंतर चहा प्यायल्याने शरीरात लोहाची कमतरता जाणवू शकते. चहा प्यायल्याने शरीर प्रथिनांसह आवश्यक पोषक द्रव्यांचे शोषण करु शकत नाही. ज्यामुळे लोह किंवा रक्ताची कमतरता भासू शकते. चहामध्ये आढळणारे फिनोलिक कंपाऊंड लोहाच्या शोषणात व्यत्यय आणते. त्यामुळे अॅनिमियाची समस्या उद्भवू शकते.