Corona : आली समीप घटिका; कोरोना महामारीबाबत WHO प्रमुखांचं मोठं विधान

Home » Corona : आली समीप घटिका; कोरोना महामारीबाबत WHO प्रमुखांचं मोठं विधान
Corona :  आली समीप घटिका; कोरोना महामारीबाबत WHO प्रमुखांचं मोठं विधान

WHO Chief On Corona : गेल्या दोन वर्षांपासून हैराण करून सोडलेल्या कोरोना महामारीचा अंत कधी होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अखेर या प्रश्नावर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस ए. गेब्रेयसस यांनी दिलासा देणारी बातमी दिली आहे. गेल्या आठवड्यातील कोरोनाच्या आकडेवारीनुसार जगातून कोरोना महामारीचा अंत दिसू लागला आहे, असे विधान टेड्रोस यांनी केले आहे. जिनिव्हा येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महामारीचा अंत करण्यासाठी संपूर्ण जग कधीही चांगल्या स्थितीत नव्हते. अद्यापही आपण त्या स्थितीत नाही. मात्र, आता या महामारीचा शेवट दृष्टीक्षेपात आहे.डॉ. टेड्रोस म्हणाले की, गेल्या आठवड्यात जगभरातील कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या मार्च 2020 नंतरच्या साथीच्या आजाराती सर्वात कमी आहे. त्यामुळे दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या जागतिक महामारीच्या उद्रेकात हे एक महत्त्वपूर्ण वळण असू शकते असे डॉ. टेड्रोस यांनी म्हटले आहे. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 2 minutes agoआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.26 minutes agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी47 minutes agoहेही वाचा: Bjp Leader : माझ्या शरीराला स्पर्श करू नका. मी पुरुष…भाजप नेत्याचे विधान चर्चेत
कोरोनाला रोखण्यासाठी जग सक्षम नसले तरी, आता कोरोनाचा अंत दिसू लागला आहे. यावेळी त्यांनी कोरोना महामारी आणि मॅरेथॉनमध्ये प्रयत्न करणाऱ्या खेळाडूची तुलना करत या महामारीचा अंतिम रेषा आता जवळ आल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आता कठोर परिश्रम करण्याची आणि सीमा रेषा ओलांडण्याची वेळ आली आहे. यामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ असा विश्वासही डॉ. टेड्रोस यांनी व्यक्त केला आहे. हेही वाचा: Corona Test App : आता आवाज ऐकून होणार कोरोना टेस्ट; वैज्ञानिकांनी केला दावा गेल्या आठवड्यात मृत्यूमध्ये 22% घसरणयुनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीने प्रकाशित केलेल्या अहवालात गेल्या आठवड्यात कोरोना मृत्युंमध्ये 22 टक्के घट झाल्याचे म्हटले आहे. ही आकडेवारी जगात 11 हजार एवढी असून, नव्या बाधितांची संख्या जगभरात 31 लाख आहे. ही आकडेवारी एकूण रूग्णसंख्येच्या तुलनेत 28 टक्क्यांनी कमी असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. कोरोनाची जगभरातील रूग्णसंख्या कमी जरी होत असली तरी, अनेक देशांमध्ये कोरोनाचे नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. हेही वाचा: खरंच समलैंगिकांनाच होते का Monkeypoxचे संक्रमण? WHO चा धक्कादायक खुलासाOmicron चे BA.5 व्हेरिएंटचे सर्वाधिक प्रकरणेजागतिक आरोग्य संघनेने दिलेल्या एका अहवालात ओमिक्रॉन आणि BA.5 च्या नव्या रूग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये जगातील सर्वात डेटाबेससह सामायिक केलेल्या सुमारे 90% व्हायरसचे नमुने समाविष्ट आहेत. अलिकडच्या आठवड्यात युरोप, यू.एस. आणि इतरत्र नियामक प्राधिकरणाने BA.5 मूळ व्हेरिएंट आणि त्यापासून नव्याने तयार होणाऱ्या उपप्रकारांना नियंत्रित करणाऱ्या ट्वीक लसींना मान्यता दिली आहे.