ॲशेस मालिकेचा थरार १६ जूनपासून

Home » ॲशेस मालिकेचा थरार १६ जूनपासून
ॲशेस मालिकेचा थरार १६ जूनपासून

लंडन : महिला आणि पुरुषांच्या ॲशेस मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली असून पुरुषांच्या ॲशेस मालिकेत १६ जून ते ३१ जुलै (२०२३) दरम्यान ५ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. तसेच महिलांच्या ॲशेस मालिकेत एकच कसोटी सामना होणार असून; ३ ट्वेन्टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांचा समावेश करण्यात आला आहे. मागच्या ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या महिला आणि पुरुष संघाने एकही सामना गमावला नव्हता. पुरुषांच्या संघाने ५ सामन्यांची ॲशेस मालिका ४-० अशी जिंकली; तर महिला संघाने मागच्यावेळी खेळली गेलेली एकमेव कसोटी अनिर्णित राखली होती. शिवाय ३ ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका १-० आणि ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली होती.Recommended Articles’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम5 minutes agoअण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद नरेंद्र पाटलांनाच देणार: मुख्यमंत्र्यांच अश्वासन माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्यालात रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांना विनम्र आदरांजली अर्पण केली. त्यावेळी एकनाथ शिंदे या8 minutes agoIND vs AUS 3rd T20I : सूर्या – विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजयIND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेव14 minutes agoकेजरीवालांनी मागासवर्गीय कुटुंबाला दिलं जेवणाचं आमंत्रण; विमानाचं तिकीटही पाठवलं
अहमदाबाद – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या गुजरात दौऱ्यात स्वच्छता कर्मचाऱ्याला दिल्लीतील त्यांच्या घरी जेवायला आमंत्रित केले. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्स नंतर केजरीवाल यांनी आणखी एक कामगार वर्ग आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Arvind Kejriwal news 15 minutes agoगेल्या १३९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये ऑगस्ट महिन्यात एकही कसोटी खेळवली जाणार नाही. २०२३ च्या ॲशेस मालिकेची घोषणा करण्यात आल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान खेळवण्यात येणारी ॲशेस मालिका ही जगातील सर्वात महत्त्वाच्या आणि कठीण कसोटी मालिकेमधील एक मालिका असून; ॲशेस खेळताना नेहमीच खेळाडूंचा कस लागत असतो. देशाबाहेर ॲशेस जिंकणे हे नेहमीच आव्हानात्मक असते आणि हे आव्हान झेलण्यास आम्ही समर्थ आहोत, असेही ते म्हणाले.पुरुषांच्या मालिकेचे वेळापत्रकपहिली कसोटी १६ ते २० जून : एजबॅस्टन, बर्मिंगहॅमदुसरी कसोटी २८ जून ते २ जुलै : लॉर्डस्, लंडनतिसरी कसोटी ६ जुलै ते १० जुलै : हेडिंगले, लीडस्चौथी कसोटी १९ जुलै ते २३ जुलै : ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरपाचवी कसोटी २७ जुलै ते ३१ जुलै : द ओव्हल, लंडनमहिलांच्या मालिकेचे वेळापत्रककसोटी २२ ते २६ जून :ट्रेंट ब्रीज,नॉटिंगहॅम.पहिला ट्वेन्टी-२० सामना १ जुलै : एजबॅस्टन, बर्मिंगहॅमदुसरा ट्वेन्टी-२० सामना ५ जुलै :द ओव्हल, लंडनतिसरा ट्वेन्टी-२० सामना ८ जुलै : लॉर्ड्स, लंडनपहिला वन डे सामना १२ जुलै : काउंटी ग्राउंड, ब्रिस्टॉलदुसरा वन डे सामना १६ जुलै :द एजेस बाउल, साउथॅम्प्टनतिसरा वन डे सामना १८ जुलै : काउंटी ग्राउंड, टॉटन.