Alka kubal birthday: सतत रडणाऱ्या अलका ताईंची लव्हस्टोरी ऐकाल तर थक्क व्हाल

Home » Alka kubal birthday: सतत रडणाऱ्या अलका ताईंची लव्हस्टोरी ऐकाल तर थक्क व्हाल
Alka kubal birthday: सतत रडणाऱ्या अलका ताईंची लव्हस्टोरी ऐकाल तर थक्क व्हाल

Alka kubal birthday: अभिनेत्री अलका कुबल. मराठी मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव. ‘माहेरची साडी’ सारखे कित्येक चित्रपट, कित्येक मालिका अजरामर केलेली ही अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रात आजही तितकीच सक्रिय आहे. मग ती ‘आई माझी काळूबाई’ मालिका असो किंवा ‘धुरळा’ सारखा दर्जेदार चित्रपट. अलका ताईंनी त्यांच्या अभिनयाची जादू कायमच दाखवली आहे. अलका कुबल म्हणजे रडणारे आणि रडवणारे सिनेमे अशी कितीही टीका त्यांच्यावर झाली तरी त्यांचा चाहताव वर्ग कमी झालेला नाही. आज अलका ताईंचा वाढदिवस. आपल्या मालिका, चित्रपट या माध्यमातून रडवणऱ्या, भावूक करणाऱ्या अलका ताई खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड रोमॅंटिक आहेत. तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी.. (Alka kubal birthday alka kubal and Sameer Athalye love story)अलका कुबळ यांचे लग्नानंतरचे नाव अलका समीर आठल्ये. अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये मनोरंजन विश्वात सिनेमॅटोग्राफर आहेत. आता तुम्ही म्हणाल यांचं प्रेम कसं जुळलं. तर त्यामागेही एक किस्सा आहे. अलका व समीर यांनी चार ते पाच चित्रपटांसाठी एकत्र काम केलं. त्यादरम्यान त्यांचा एक ग्रुप तयार झाला. या ग्रुपमध्ये दोघांचीही चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. Recommended Articlesबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर41 minutes agoIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा ‘विराट’ विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 – 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त42 minutes agoMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.42 minutes ago’सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे’ कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक! मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम48 minutes agoप्रेमात पडल्यानंतर दोघं अनेकदा जुहू चौपाटीवर फिरायला जायचे. समीर आणि अलका यांचं एकत्र असणं अनेकांच्या नजरेत आलं होतं. एके दिवशी अलका यांच्या आईने त्यांना विचारलं, “तुम्ही दोघं एकत्र फिरता, लोक चर्चा करतात, नक्की तुमच्यात काय आहे?” हे ऐकून अलका जरा घाबरल्या. कारण तोपर्यंत दोघांपैकी कोणीच एकमेकांना प्रपोज केलं होतं. कोण कोणाला पहिला विचारणार आणि पुढून उत्तर काय येणार याची भीती दोघांमध्ये होती. अखेर आईने तगादा लावल्यावर अलका यांनी पुढाकार घेतला आणि समीर यांना लग्नासाठी विचारलं. अलका यांनी पुढाकार घेताच समीर यांनीही लगेच होकार दिला. पुढे हे प्रेम बहरत केले आणि कॅमेरासमोर असणाऱ्या अलका कुबल आणि कॅमेरामागे असणारे समीर खऱ्या अर्थानं एक झाले. View this post on Instagram A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23) अलका यांच्या आईने सुरुवातीला या दोघांच्या लग्नाला नकार दिला होता. दोघंही एकाच क्षेत्रात कामाला असल्याने पुढे मतभेद झाल्यास नात्यावर परिणाम होणार अशी त्यांना भीती होती. पण समीर व अलका यांना त्यांच्या प्रेमावर खूप विश्वास होता. त्यांनी लग्नाचा निर्णय ठाम ठेवला. आज 25 वर्षाहून अधिक काळ त्यांचा सुखी संसार सुरू आहे.