‘संघर्ष न करता चीनला दिला भूभाग’ : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप

Home » ‘संघर्ष न करता चीनला दिला भूभाग’ : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप
‘संघर्ष न करता चीनला दिला भूभाग’ : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप

नवी दिल्ली : ‘ताबारेषेवर एप्रिल २०२० ची यथास्थिती चीनने मान्य केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही संघर्ष न करता चीनला एक हजार चौरस किलोमीटर भूभाग देऊन टाकला आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. लडाखमधील सैन्य माघारीवरून त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.दोन वर्षांपूर्वी भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात संघर्ष झडला होता. वाढलेल्या तणावानंतर ताबारेषेवर एप्रिल २०२० ची यथास्थिती पूर्ववत झाल्याखेरीज चीनशी द्विपक्षीय संबंध सुधारणार नाही, असे भारताकडून वारंवार सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर पूर्व लडाखमधील गोगरा-हॉटस्प्रिंग भागतील गस्तीबिंदू १५ वरून सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. ती पूर्ण झाल्याचे निवेदन भारताकडून जारी करण्यात आले आहे.जुलैमध्ये दोन्ही देशांच्या कोअर कमांडर पातळीवरील वाटाघाटींमध्ये याबाबत सहमती झाली होती. या माघारीनंतर मधला पट्टा ‘बफर क्षेत्र” म्हणून मानला जाणार असल्याने भारतीय सैन्याने याआधीचा आपला गस्तीचा अधिकार गमावल्याचीही टीका होत आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसने या निर्णयावर टीका केली.‘भारत जोडो‘ यात्रेत असलेल्या राहुल यांनी ट्विटमध्ये केले. त्यांनी म्हटले आहे, की ताबारेषेवर एप्रिल 2020 ची यथास्थिती कायम राखण्याची भारताची मागणी चीनने धुडकावली आहे. कोणताही संघर्ष न करता पंतप्रधानांनी एक हजार चौरस किलोमीटर भूमी चीनला देऊन टाकली आहे.‘ ही भूमी परत कशी मिळेल ? हे भारत सरकार सांगू शकेल? ‘असे सवालही राहुल यांनी उपस्थित केले. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही हा निर्णय ही तडजोड असल्याचा प्रहार केला.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 2 minutes agoआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.26 minutes agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी47 minutes ago